आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युज

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हाकार्यवाह पदी अनंत जोशी यांची निवड

मराठवाड्यातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उमद्या नेतृत्वाला परिषदेने दिली संधी .

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

वै.महाराष्ट्र  (प्रतिनिधी)

अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची बीड जिल्हा कार्यकारिणी समिती बैठक राजेंद्र खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा कार्यवाह म्हणून योगेश्वरी नूतन विद्यालयातील सहशिक्षक श्री.अनंत जोशी यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान चाटे कोषाध्यक्ष विष्णु मिसाळ , उपाध्यक्ष तात्यासाहेब जेवे, दिनेश घोळवे सदस्य ,डी एन बांगर, काकासाहेब चौधरी महिला विभाग प्रमुख रूपाली देशमुख ताई यांची नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगी शिक्षकांचे प्रश्न सोडवणे हिच प्राथमिकता असेल असे मत सर्वांनी मांडले. यावेळी बोलताना मा. प्रा किरण पाटील यांनी निवडणूकिमधिल हार जीत हा भाग महत्वाचा नसून शिक्षकांच्या जिव्हाळ्याचे अनुदान , जुनी पेन्शन योजना आश्वासित प्रगती योजना यांसारखे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटना संपूर्ण ताकदिनीशी आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.तसेच राज्य सरकार्यवाह राजकुमार बोनकीले सरांनी राज्याचे पदाधिकारी कायम आपल्यासोबत असतील याची गवाही दिली.
यावेळी राज्य सरकार्यवाह राजकुमार बोनकिले, प्रा. किरण पाटील , प्रा. चंद्रकांत मुळे
विभागाध्यक्ष नंदकिशोर झरीकर ,
कार्यवाह सुरेश पठाडे संघटन मंत्री मधुकरराव कुलकर्णी, उमेश जगताप, शरद ढवळे व बीड जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष कार्यवाह उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर व हिंगोली जिल्हा प्रतिनिधि उपस्थित होते.
या बैठकीचे सुत्रसंचलन कार्यवाह प्रा.बाळासाहेब साळवे यानी केले .
बैठकीतील उपस्थितांचे आभार भगवानराव चाटे यानी मानले.

सदरील निवड झालेली माहिती  प्राप्त होताच  शैक्षणिक , सामाजिक,राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे …

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.