महाराष्ट्र समाजरत्न पुरस्काराने स्नेहछाया परिवार पुणे चे संचालक मा.श्री. दत्तात्रय इंगळे सन्मानित
मा.दत्तात्रय इंगळे यांच्या सामाजिक कार्याची विशेष दखल

वैभवशाली महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे /प्रतिनिधी
पुणे/ भोसरी दि.२०/०८/२०२२दिव्या शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे अर्थात दिव्या परिवार पुणे यांच्यावतीने सामाजिक कार्याचा गौरव म्हणून दिला जाणारा २०२१-२०२२ चा #महाराष्ट्र_समाजरत्न_पुरस्कार देऊन भोसरी पुणे येथील स्नेहछाया परिवाराचे संचालक दत्तात्रय इंगळे यांना सन्मानित करण्यात आले .
दिव्या परिवार दिघी पुणे आयोजित
मागील दोन वर्षापासूनच्या इयत्ता दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अंकुशराव लांडगे नाट्यगृह,भोसरी येथे पार पडला.यावेळी स्नेहछाया परिवाराच्या कार्याची दखल घेत
दिघी गावचे भुषण,दिघी चे शिल्पकार व ज्येष्ठ समाजसेवक ह.भ.प.आदरणीय श्री दत्तात्रय गायकवाड ऊर्फ आबा आणि IAS Officer आदरणीय श्रीकांत खंडागळे साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.याप्रसंगी मा.नगरसेविका
आदरणीय निर्मलाताई मनोज गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते श्री संजय भाऊ गायकवाड,विविध संस्था व क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते. दिव्या परिवाराचे संस्थापक प्रा. इंद्रजीत भोसले सर व इतर सदस्य यांनी सदर आम्हाला पुरस्कारासाठी पात्र ठरवले व
यथोचित सन्मान केल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करण्यात आले असुन सदर पुरस्कार हा केवळ माझा नसुन तो परिवाराशी जोडलेल्या प्रत्येक सामाजिक मन, आणि दातृत्वांच्या हातांचा आहे.
स्नेहछाया परिवारातील सर्व दाते मंडळींचे मनापासून अभिनंदन…. आसे मनोगत पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी व्यक्त करण्यात आले . सदरील पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , औद्योगिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे .
माहितीसाठी संपर्क – :
प्रा.दत्तात्रय इंगळे/७७७ ६८४९ ७७७
स्नेहछाया परिवार
पिंपरी चिंचवड, पुणे