प्रा.जावेद शेख यांनी डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल तुकाराम पवार शिक्षण मंडळाचे सचिव श्री.करपे सर यांच्या हस्ते सत्कार
केज तालुक्यातील भुमिपुत्राची हिंदी विषयात पदवी

वैभवशाली महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बीड जिल्हा प्रतिनिधी
केज तालुक्यातील भुमिपुत्र वडमाऊली दहिफळचे भुमिपुत्र तथा काळेगाव माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय काळेगाव घाट येथील प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले व सामाजिक , शैक्षणिक , पत्रकारिता क्षेत्रात ज्यांनी भुमिका कायम यशस्वी व प्रेरणादायी राहिले आसे यशस्वी भुमिपुत्र प्रा. जावेद रहेमान शेख यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत हिंदी विषयात आपल्या अथक प्रयत्नाने व अभ्यासातून पीएचडी हि अतिशय प्रतिष्ठेची पदवी हिंदी विषयात प्राप्त केली असुन पदवी प्राप्त केल्याबद्दल शैक्षणिक , सामाजिक , राजकीय तसेच मित्र मंडळ , नातेवाईक मंडळी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्याचप्रमाणे आज त्यांच्या नेकनुर येथील निवासस्थानी जाऊन माजी जेष्ठ शिक्षण विस्तार व सावळेश्वर पैठण येथील तुकाराम पवार शिक्षण व महिला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री बाबासाहेब करपे सर यांनी डॉ जावेद शेख यांनी डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल विशेष सत्कार करत पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित , मा.मुख्याध्यापक शेख सर , संपादक – गोविंद शिनगारे , तेजश करपे सह परिवार उपस्थित होते .