49 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागातील शाळेचा विद्यार्थी चमकला
पिंपळगाव हायस्कुल पिंपळगाव ने पटकावला तृतीय क्रमांक

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
केज /प्रतिनिधी
तालुकास्तरीय 49 वे विज्ञान प्रदर्शन केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालय येथे आयोजित करण्यात आले होते .सदर प्रदर्शनात विक्रमी 147 बालवैज्ञानिकानी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिका यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.यामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांनी जास्तीतजास्त सहभाग नोंदवला होता .
केज तालुक्यातील पिंपळगाव येथील पिंपळगाव हायस्कुल पिंपळगाव च्या शाळेतील वाघमारे आदित्य आत्माराम या विद्यार्थ्याने 6 वी ते 8 वी गटात तृतीय क्रमांक पटकावला.
या विद्यार्थ्यांना सहायक शिक्षिका शेख जे .डी. यांचे मार्गदर्शन मिळाले. विज्ञान प्रदर्शनाचा समारोप समारंभ .मा. श्रीकांत कुलकर्णी साहेब (प्रा.शिक्षणाधिकारी)जिल्हा परिषद बीड, यांच्या अध्यक्षतेखाली व मा.हिरालाल कराड साहेब (प्रा .उपशिक्षणाधिकारी)जिल्हा परिषद बीड, गट शिक्षणाधिकारी केंद्रे साहेब तसेच मा.रंगनाथ राऊत जेष्ट शिक्षण विस्तार अधिकारी जि. प.बीड व सानेगुरुजी निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापिका डॉ गित्ते मॅडम , परीक्षक,मार्गदर्शक, शिक्षक ,सर्व विद्यार्थी, हा कार्यक्रम संपन्न झाला . पिंपळगाव हायस्कुल पिंपळगाव चा विद्यार्थी तृतीय आल्यामुळे संस्थेचे अध्यक्षा डॉ. सौ.अनिता दहिफळकर ,सचिव डॉ शशिकांत दहिफळकर, उपाध्यक्ष शरद गदळे, शाळेचे मुख्याध्यापक ढाकणे एच. ए.सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.