अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचा शानदार पदग्रहण सोहळा
डॉक्टरांनी बांधिलकी जोपासत सामाजिक सौहार्द टिकवावा - डॉ.अमोल अन्नदाते

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
कोणत्याही देशाच्या प्रगतीचे मापन हे तेथील दरडोई उत्पन्नावरून ठरत नाही. तर ते ठरते माता मृत्यू आणि बाल मृत्यू यांचा दर काय आहे यावरून, डॉक्टर आणि रूग्ण यांचे नाते हे आई व बाळा सारखे आहे. तेव्हा एकमेकांना समजून घेत डॉक्टरांनी बांधिलकी जोपासत सामाजिक सौहार्द टिकवावा असे आवाहन सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.अमोल अन्नदाते यांनी केले. ते अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या पदग्रहण समारंभात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.
अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या पदग्रहण समारंभ तसेच “डॉक्टर-रूग्ण यांचे नाते काल, आज आणि उद्या” या विषयावर डॉ.अमोल अन्नदाते यांच्या व्याख्यानाचे गुरूवार, दिनांक २५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषदेच्या आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य दंत परिषदचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे तर या वेळेस प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, डॉ.रमेश भराटे, डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, डॉ.नवनाथ घुगे, डॉ.अतुल देशपांडे यांच्यासह अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे, डॉ.विठ्ठल केंद्रे (सचिव), डॉ.मनोज वैष्णव (उपाध्यक्ष), डॉ.महेश ढेले (कोषाध्यक्ष), डॉ.शितल सोनवणे (सहसचिव), डॉ.सुधीर धर्मपात्रे, डॉ.शिवाजी मस्के, डॉ.योगिनी नागरगोजे, डॉ.ऋषिकेश घुले, डॉ.मनिषा पवार, डॉ.इम्रान अली, डॉ.सुलभा पाटील, डॉ.विशाल भुसारे या मान्यवरांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळेस प्रमुख व्याख्याते म्हणून बोलताना सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.अमोल अन्नदाते यांनी संघटनेचे महत्त्व पटवून दिले, समाजातील वाढती नकारात्मकता याबाबत खंत व्यक्त करून डॉक्टर व रूग्ण यांचे संबंध जपणे काळाची गरज आहे, बरं बोलणाऱ्या डॉक्टरपेक्षा खरं बोलणाऱ्या डॉक्टरकडे जा, डॉक्टर मिञ जोडण्याची कला शिकून घ्यावी, डॉक्टर व रूग्ण यांच्यात मध्यस्थ असू नये, नातेभाव जोपासा असे आवाहन करून विविध दाखले आणि संदर्भ देत डॉ.अन्नदाते यांनी विषयाची मांडणी केली. अंबाजोगाईत अतिशय चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल डॉ.नरेंद्र काळे व नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाची सुरूवात नवकेशर डान्स अँड ड्रामा अकॅडमीच्या बाल कलावंतांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने झाली. त्यानंतर मान्यवरांकडून दिवंगत डॉ.राम भालचंद्र, डॉ.व्यंकटराव डावळे, डॉ.द्वारकादास लोहिया आणि माजी आरोग्यमंञी डॉ.विमलताई मुंदडा यांच्या प्रतिमेस अभिवादन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कडून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तर उपस्थित मान्यवरांचे हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांना संघटनेचा चार्टर, काॅलर, शेला, सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प प्रदान करण्यात आले. तसेच सचिव डॉ.विठ्ठल केंद्रे आणि सर्वच कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसह आजीव सदस्य यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक करताना डॉ.नवनाथ घुगे यांनी संघटनेची स्थापना, उद्दिष्ट आणि भविष्यातील वाटचाल याबाबत अधिक माहिती दिली. तर अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांनी संघटनेचा प्रथम अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. संघटनेचे महत्त्व विषद केले. पुढील दोन वर्षांत १) दर दोन वर्षांत एक “एॅम्पाकॉन कॉन्फरन्स” घेणार, २) अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे भवन (भव्य वास्तू) उभारणार, ३) संघटना अधिक मजबूत करून नांवारूपास आणणार असे तीन संकल्प जाहीर करून ते पुर्ण करण्याची ग्वाही दिली. तर डॉ.रमेश भराटे यांनी एकीचे बळ, संघटनाचे महत्त्व पटवून दिले. डॉ.धाकडे यांनी जाहीर केलेले संकल्प कौतुकास्पद आहेत असे सांगितले. तर डॉ.सिद्धेश्वर बिराजदार यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. तर माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी व ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी संघटनेस आवश्यकतेनुसार सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.नरेंद्र काळे यांनी सांगितले की, संघटना स्थापन करण्याची कल्पना माझी होती, त्याला सर्व डॉक्टर बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, अंबाजोगाईच्या वैद्यकीय क्षेत्राने आपला वेगळा दबदबा निर्माण करून राज्याला कर्तृत्ववान नेतृत्व दिल्याचे सांगितले, अंबाजोगाईतील खाजगी वैद्यकीय व्यवसाय संवेदनशीलता जोपासत नैतिकतेने सुरू असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी तर प्रास्ताविक डॉ.नवनाथ घुगे यांनी करून उपस्थितांचे आभार डॉ.विठ्ठल केंद्रे यांनी मानले. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, माऊली ग्रुप अंबाजोगाई तसेच डॉ.राहुल धाकडे यांच्या मिञ परिवाराकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला. यावेळेस सभागृहात डॉ.पी.एस.पवार, अमर हबीब, डॉ.गोपाळ चौसाळकर, डॉ.दिलीप खेडगीकर, माजी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, एॅड.अनंतराव जगतकर, प्रा.डी.जी.धाकडे, एॅड.सुनिल सौंदरमल, डॉ.नितीन चाटे, डॉ.अनिल भुतडा, डॉ.श्रीनिवास रेड्डी, डॉ.सुरेश अरसुडे, दगडू लोमटे, एस.बी.सय्यद, राजेंद्र घोडके, डॉ.संदिप थोरात, मुजीब काझी, डॉ.अतुल शिंदे यांच्यासह अंबाजोगाई शहर व पंचक्रोशीतील वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, साहित्य, संगीत, शिक्षण, सहकार, सांस्कृतिक, विधी, पञकारीता, क्रीडा, बँकिंग आदी क्षेत्रातील मान्यवर, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे, डॉ.विठ्ठल केंद्रे (सचिव), डॉ.मनोज वैष्णव (उपाध्यक्ष), डॉ.महेश ढेले (कोषाध्यक्ष), डॉ.शितल सोनवणे (सहसचिव), डॉ.सुधीर धर्मपात्रे, डॉ.शिवाजी मस्के, डॉ.योगिनी नागरगोजे, डॉ.ऋषिकेश घुले, डॉ.मनिषा पवार, डॉ.इम्रान अली, डॉ.सुलभा पाटील, डॉ.विशाल भुसारे आदींसह सर्व सन्माननिय सदस्य यांनी पुढाकार घेतला.