आदर्श सरपंच मा. भास्कर पेरे पाटील यांच्या समाजप्रबोधन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन – आयोजक मा.अंकुश करपे मित्र परिवार सावळेश्वर
श्री शिवछत्रपती गणेश मित्र मंडळ सावळेश्वरच्या वतीने समाजप्रबोधनपर सामाजिक उपक्रमाचे आयोजन

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील सावळेश्वर (पैठण) येथे अंकुश करपे मित्र परिवार आयोजित श्री शिवछत्रपती गणेश मित्र मंडळ सावळेश्वरच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श गाव पाटोद्याचे आदर्श सरपंच मा. भास्कर पेरे पाटील यांच्या समाजप्रबोधनपर व्याख्यानाचे भव्य दिव्य आयोजन बुधवार दिनांक 7-9 -2022 रोजी सकाळी ठिक 09.00 वाजता स्थळ – महादेव मंदिर सावळेश्वर ता.केज जि.बीड येथे करण्यात आले असुन सदरील कार्याक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष कुलदीप करपे यांची उपस्थिती राहणार आहे . तरी मौजे सावळेश्वर नगरीतील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री . अंकुश करपे उपसरपंच सावळेश्वर , डॉ शिवाजी मस्के , श्री बापुराव पवार चेअरमन सावळेश्वर , श्री . अरुण मस्के व्हा.चेअरमन , श्री . सुंदर पवार , माजी सरपंच सावळेश्वर , श्री.राजेभाऊ गोरडे व श्री शिवछत्रपती गणेश मित्र मंडळ सावळेश्वरचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे .