स्व.विनायकराव मेटे साहेबांच्या विचारांचा व संघर्षांचा वारसा चालवणार …डॉ.उत्तम खोडसे

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
बीड (वार्ताहर )
शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष स्व. विनायकराव मेटे यांचे नुकतेच दुर्देवी अपघाती निधन झाले परंतु त्यांनी शिकवलेला संघर्षाचा व विचारांचा हा वारसा शिवसंग्रामच्या मावळियांकडून कदापी सोडला जाणार नाही. गोरगरीब वंचित उपेक्षितांचे प्रश्न मार्गी लागावेत त्यांना सढळ हाताने मदत करावी हा संघर्षाचा वारसा आम्ही त्यांच्या पश्चात पूर्ण ताकतीने चालवणार आहोत असे शिवसंग्रामचे नेते डॉ. उत्तम खोडसे यांनी म्हटले आहे.
जिल्हा परिषद युसुफ वडगाव सर्कल मधील शिवसंग्रामचे नेते व धडाडीचे कार्यकर्ते स्व.विनायकराव मेटे साहेब यांच्या पश्चात त्यांच्या संघर्षाचा व विचाराचा वारसा त्यांनी चालवण्याचा ठाम निर्धार केला आहे. सध्या गावोगावी गणेश मंडळाकडून श्रींची स्थापना केली जात आहे . केज तालुक्यातील विविध गावांतील श्री गणेश मंडळांना भेटी देऊन साहेबांच्या संकल्पनेला कायम तेवत ठेवण्यासाठी मौजे , सुर्डी येथे दोन मंडळ , सोनेसांगवी -1, सोनेसांगवी -2, माळेगांव , पाथरा , गोटेगाव, सुकळी या सर्व गावांतील श्री गणेश मंडळांना भेटी घेऊन शिवसंग्राम परिवार महाराष्ट्र राज्याच्या वतीने सन्मान पत्र 2022 देऊन गौरविण्यात आले .
यावेळी सर्व श्री गणेश मंडळ पदाधिकारी व ग्रामस्थांची विशेष उपस्थिती होते. या गणेश मंडळाचे गावोगावी जाऊन दर्शन घेतले तसेच कार्यकर्ते व गावकऱ्यांशी चर्चा केली, सामाजिक संदेश देऊन मार्गदर्शन केले, ग्रामीण भागातील गणेश भक्तांना गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना वाव मिळावा यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.शिवसंग्राम केज तालुक्याच्या पदाधिकाऱ्या समवेत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की,आपण प्रत्येकजण लोकनेते स्व.विनायकराव मेटे यांच्या विचारांचा व संघर्षाचा वारसा एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून चालवणार आहोत, एकमेकांच्या सुख -दुःखात सहभागी होऊन सक्षमपणे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणार आहोत . स्व. विनायकरावजी मेटे साहेबांचा आशीर्वाद शिवसंग्राम व प्रत्येक मावळ्यांच्या पाठीशी आहेच त्यामुळे आता खऱ्या अर्थाने नेटाने कामाला लागून जिल्हा परिषद ,पंचायत समिती तथा नगरपंचायत व महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकतीने उतरून शिवसंग्रामला गुलाल लागेल हीच खरी स्व.साहेबांना आदरांजली असेल असे सांगितले तसेच वंचित उपेक्षित व विस्थापित लोकांचे प्रश्न मार्गी लागावेत हे साहेबांचे स्वप्न त्यांच्या पश्चात पूर्ण करणार असा ठाम विश्वासही डॉ. उत्तम खोडसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.