सावळेश्वरचे उपसरपंच अंकुश करपे मित्र मंडळ यांच्या संकल्पनेतून आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान संपन्न
गणेशोत्सवा निमित्त शिवछत्रपती गणेश मंडळांकडून नियोजन

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
समाजप्रबोधन विशेष
केज दि 7(प्रतिनिधी)
गावच्या विकासासाठी लोकांनी दोन पाऊल पुढे यावं आणि ग्रामपंचायतीने दोन पाऊल पुढे यावे तरच गावचा विकास शक्य असे मत पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले ते तालुक्यातील सावळेश्वर येथील कर्मक्रमात व्याख्याते म्हणून बोलत होते.
गणेशोत्सवा निमित्त अंकुश करपे मित्र मंडळ सावळेश्वरच्या वतीने व शिवछत्रपती गणेश मंडळाकडून सावळेश्वर येथे पाटोदा गावचे आदर्श सरपंच तथा शिल्पकार भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान बुधवार दि (7) रोजी सकाळी दहा वाजता झाले. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे सावळेश्वर चे उपसरपंच अंकुश करपे ,पत्रकार डाॅ,हणमंत सौदागर, पत्रकार मनोराम पवार,पैठण से.स.सो चेअरमन गौतमराव चौधरी, चेअरमन बापुराव पवार, समाजसेवेत सक्रीय डाॅ,शिवाजी मस्के ,डाॅ, सौ,भाग्यश्री मस्के ,अनिल करपे सह
आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले
पैसे सर्वश्रेष्ठ नाही. राजकारणातून पैसा कमवायचा या उद्देशाने पुढे येऊ नका. मतदारांनी पैसा घेऊन मतदान करणे महाप्राप आहे त्यातून गावाच्या पिढ्यान पिढ्या बरबाद होतील. युवकांनो आई-वडिलांची सेवा करा जेष्ठाचा आदर करा, ग्रामपंचायतीचा कर भरला पाहिजे. कर भरल्यानंतर ग्रामपंचायत ने नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. निवडणुकीच्या काळात जात धर्म ,पक्ष ,पार्टी असा कोणताही कलुशीत मत डोक्यात न ठेवता जो गावाचं भलं करेल अशाचउमेदवाराला मतदारांनी निवडून दिले पाहिजे.
एकमेकांचे मतभेद दूर करून मागे काय झालं हे न पाहता येणाऱ्या पिढीसाठी सर्वांना एकत्र येऊन काम केलं पाहिजे. गावात फळझाडे लावणे आवश्यक आहे.गावात स्वच्छताठेवली पाहिजे. सर्वांनी सौचालयाचा वापर केला पाहिजे ,ती सर्वांची जबाबदारी आहे.असे मत व्यक्त केले.कार्यक्रमास गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महिलांची हजेरी मोठ्या प्रमाणात होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्तविक अंकुश करपे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवछत्रपती गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्यासह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.