शासकीय अनुदानासह २५% अग्रीम विमा वाटपातुन विडा मंडळ वगळल्याने रस्ता रोको
शेतकऱ्यांसाठीच रास्ता करण्याचे पंचायत समिती सदस्य पिंटु ठोंबरेंचे प्रशासनाला निवेदन

केज प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळे शासकीय अनुदानासह पिक विमा कंपनीकडून २५% अग्रीम वाटपातून वगळण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक मंडळातील शेतकऱ्यांचा सरकार सह लोकप्रतिनिधींवर रोष दिसून येत आहे. गोगलगाईचे संकट संपते ना संपते तोच पावसाने दडी मारल्याने उरलेल्या पिकांची लागलेली पाने, फुले गळुन पडली तर पुन्हा अतिवृष्टी सारखा पाऊस झाला यामुळे काही पिके करपली तर पुन्हा गोगलगाईंचे प्रमाण वाढल्याने जवळपास ७० टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे.
तरी देखील जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळे हेवगळण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची भूमिका ठोस नसल्याने शेतकरी वर्ग नाराज झाला आहे.
तर केज तालुक्यातील विडा हे महसूल मंडळ वगळल्याने विडा पंचायत समिती सदस्य दत्तात्रय (पिंटु) ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्या दिनांक – १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० :30 वाजता बीड-केज रोडवरील आंबळाचा बरड या ठिकाणी भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या मध्ये शेतकऱ्या साठी विविध मागण्या मान्य करण्यासाठी रास्ता रोखो करण्यात येणार आहे . याबाबत चे तहसीलदारांना आज निवेदन देण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन पंचायत समिती सदस्य पिंटु ठोंबरे यांनी केले आहे.