बीड जिल्ह्यातील ५४३ शाळा- महाविद्यालयांना मिळणार 01 लाख 93 हजार पुस्तके
शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या आमदार निधीतून मिळणार पुस्तके

बीड/प्रतिनिधी
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचे लढवय्ये शिक्षक आ. विक्रम वसंतराव काळे हे सातत्याने गेल्या तीन टर्म पासून शिक्षक मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना दरवर्षी सारखाच आमदार स्थानिक विकास निधी, विकास कामांसाठी मिळत असतो. विधानसभेच्या सदस्यांचा मतदार संघ हा दोन किंवा तीन तालुक्यांचा मिळून असतो. परंतु मराठवाडा विभागाचा शिक्षक मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा मतदार संघ आहे. या मतदार संघात 8 जिल्हे व 76 तालुके येतात. 48 आमदार व 8 खासदारांचा मिळून हा मतदारसंघ तयार झालेला आहे. त्यामुळे आमदार निधीचे वितरण करताना फार मोठी कसरत करावी लागते. आ. विक्रम काळे सरांनी आमदार निधी वितरण करताना कधीही भेदभाव केलेला नाही. किंवा कधीही राजकीय दृष्टीकोण समोर ठेवलेला नाही. शाळेमध्ये सर्व जाती धर्माची लेकरे शिक्षण घेतात. तसेच शाळेमध्ये सर्व जाती धर्माचे शिक्षक कर्मचारी असतात. त्यामुळे शाळा किंवा महाविद्यालयाचे संस्थाचालक हे कोणत्याही पक्षाचे असले तरी निधीचे वितरण करताना समान न्यायाचे धोरण ठेऊन आज पर्यंत मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना 5000 संगणक व प्रिंटर चे वाटप करण्यात आलेले आहे. व आता मराठवाडा विभागातील 8 जिल्ह्यातील 3300 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, आश्रम शाळा, वरिष्ठ महाविद्यालयांना रु 10 कोटी 31 लक्ष 25 हजार किमतीची 11 लक्ष 75 हजार पुस्तके वितरीत केल्या जाणार आहेत. त्यापैकी बीड जिल्ह्यातील १००% अनुदानित ५४३ माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, व्हिजेएनटी आश्रमशाळा, एससी आश्रमशाळा तसेच वरिष्ठ महाविद्यालयांना, प्रत्येक शाळेस रू ३१०००/- प्रमाणे ३५५ पुस्तकांचा संच याप्रमाणे रू ०१ कोटी ६८ लाख ३३ हजार किंमतीची , ०१ लाख ९३ हजार पुस्तके ग्रंथालयासाठी वितरीत करण्याचा शुभारंभ व मुख्याध्यापकांची कार्यशाळा शुक्रवार दि. १६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० : ३० वा. आशिर्वाद मंगल कार्यालय, बार्शी रोड, बीड येथे माजी सामाजीक न्याय मंत्री तथा पालकमंत्री मा. आ. धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभहस्ते व माजी राज्यमंत्री तथा मा. आ. प्रकाशदादा सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली व मा. आ. सतिष चव्हाण (औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ), मा. आ. संदिपभैय्या क्षीरसागर (विधानसभा सदस्य, बीड), मा. आ. बाळासाहेब आजबे, (विधानसभा सदस्य, आष्टी- पाटोदा), माजी आ. अमरसिंह पंडीत, (प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) माजी. आ. राजेंद्र जगताप, माजी. आ. पृथ्वीराज साठे, माजी. आ. संजय दौंड, डॉ. नरेंद्र काळे (प्रदेश उपाध्यक्ष, रा.काँ.पा.), मा. महेबूब शेख (प्रदेशअध्यक्ष, रा.यु.काँ.), मा. राजेश्वर चव्हाण (जिल्हाध्यक्ष रा.काँ.पा.), मा. राजेसाहेब देशमुख (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस), मा. अनिलदादा जगताप (शिवसेना, जिल्हाप्रमुख), यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी, जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, वरिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व शिक्षकप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन श्री. नागनाथ शिंदे (शिक्षणाधिकारी), श्री. जालींदर पैठणे सर, (अध्यक्ष, बीड जि. मु अ. संघ), श्री. निळकंठ जाधव, (सचिव, बीड मु अ.संघ), श्री. रविंद्र खोड सर (जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक संघ बीड), श्री. कल्याणराव वाघमारे सर , प्राचार्य.डॉ. श्री. विवेक मिरगने, प्राचार्य. डॉ. वसंतराव सानप, प्रा. रमेश वारे, प्रा. विलास भिल्लारे, प्रा. गौदंकर सर, श्री. नवनाथ मात्रे सर, श्री. भगवान गव्हाणे, श्री. संजय शिंदे, श्री. आर.जे. इंगोले सर, श्री प्रताप शेंडगे सर, श्री. संतोष डोंगरे सर, श्री. रामनाथ डाके सर, श्री. कैलास लगड सर, श्री. नारायण गवते सर, प्रा. श्री. सतेंद्र पाटील, वसंत राठोड सर ,अण्णासाहेब शिरसाट सर, संतोष गरडे सर, श्री. डी.जी. शिंदे सर, श्री. मसने सर, श्री. ठाकुर सर, श्री. अभिजीत जोशी सर, श्री सुनिल केंद्रे, श्री राजकुमार कागदे सर, श्री. शिवाजी खांडे सर, श्री. आत्माराम वाव्हुळ सर, सौ. मुक्ता मोटे मॅडम, यांनी केले आहे.