मांजरा जलाशयात मत्स बोटूकली साठवणूक सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय बीड राजेश पाटीलसाहेब व मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांच्या हस्ते शुभारंभ

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
केज प्रतिनिधी
मांजरा प्रकल्प मत्सव्यवसाय सहकारी संस्थे कडे दीर्घ मुदतीच्या ठेक्याने असल्या मांजरा जलाशयात गुरुवारी मत्सबोटूकली साठवणूक कार्यक्रम सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय बीड राजेश पाटील साहेब व डॉ.अजय सोनवणे मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी,बीड यांच्या हस्ते पार पडला
सदर मत्सबोटूकली ही महाराष्ट्र मत्सबीज उत्पादन केंद्र माजलगाव येतून आणून मांजरा जलाशयात साठवणूक केली आहे साठवणू कार्यक्रम हा ईष्ताक पूर्ती होई पर्यंत सोडण्यात येणार असून त्या दुस्टीने संस्थेने सर्वत्यपरी उपाय योजना केल्या आहेत आज 6 लाख मत्सबोटूकली साठवणूक संचयन झाले असून उर्वरित मत्सबोटूकली साठवणूक कार्यक्रम चालूच आहे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय बीड राजेश पाटीलसाहेब व डॉ. अजय सोनवणे मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी,बीड यांच्या हस्ते मांजरा जलाशयात मत्सबोटूकली साठवणूक करण्यात आले आहे यावेळी सरपंच सुहास गुजर, मंगेश गुजर,विकासअण्णा पाटील, दयानंद गुजर यांची उपस्थिती होती याशिवाय मांजरा प्रकल्प मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमन लक्षमन पांडुरंग सोनवणे , मंगेश मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमन मंगेश हंडीबाग, व मांजरा आपत्तीग्रस्त सहकारी संस्थे चे चेअरमन दिनेश लोंढे व संस्थेचे सभासद नाना पवार व इतर सभासद यांची प्रमुख उपस्थिती होती