छावा संघटनेच्या वतीने सह्याद्री मराठी पत्रकार संघ केजच्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार संपन्न
छावाचे बीड जिल्हा अध्यक्ष शिवाजी ठोंबरे यांनी सत्कार करुन अध्यक्ष व पदाधिकारी यांना दिल्या शुभेच्छा ..

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
सह्याद्री मराठी पत्रकार संघाचा सत्कार समारंभ विशेष
केज प्रतिनिधी
केज तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा बीड छावाचे बीड जिल्हा अध्यक्ष शिवाजी ठोंबरे यांनी सत्कार करुन अध्यक्ष व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
केज तालुक्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यावर निर्भीडपणे हा संघ काम करत आहे असे छावाचे बीड जिल्हा अध्यक्ष शिवाजी ठोंबरे यांनी प्रेरणा देणारे उद्गार काढले. सहयाद्री मराठी पत्रकार संघ व सामाजिक संघटना ह्या समाजाचे वास्तव प्रश्न पटलावर आणुन समाजहितासाठी कायम कटिबद्ध असतात याच उद्देशाने संघाची स्थापना करण्यात आली असुन संघाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात शेतकरी, कामगार ,कष्टकरी, व आपल्या छावा संघटनेचे सामाजिक कार्या प्रसिद्धीसाठी आमचा संघ सदैव तत्पर असणारा आहे . सह्याद्री मराठी पत्रकार संघ अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य भविष्यात हा संघ करणार असल्याचे आपणास दिसेल याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा.डॉ.जावेद शेख यांनी सांगितले.व छावा संघटनेच्या वतीने सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा यथोचित सन्मान करुन पुढील यशस्वी वाटचालीस शिवाजी ठोंबरे यांनी शुभेच्छा दिल्या.