आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

आदर्श शिक्षिका स्व.मिराताई शिनगारे यांचे सामाजिक , शैक्षणिक कार्य भावी पिढीस प्रेरणा देणारे – रामायणाचार्य नाना महाराज कदम

आवसगाव येथे आदर्श शिक्षिका कै.मिराताई शिनगारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिम्मित विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती

वैभवशाली महाराष्ट्र न्युज विशेष..!

केज तालुक्यातील आवसगाव येथील आदर्श शिक्षिका सम्राट अशोक मा विद्यालय गोटेगाव तथा राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका कै. मिराताई गोविंद शिनगारे यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त रामायनाचार्य नाना महाराज कदम बकंटस्वामी संस्थान नेकनुर यांचे भव्य दिव्य असे मंत्रमुग्ध करणारे व सामाजिक, शैक्षणिक , कौटुंबिक विचारांची प्रेरणा देणारी शुश्राव्य अशी कीर्तन सेवा शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 ते 12 वेळेत निसर्गरम्य वातावरणात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या तसेच नातेवाईक , मित्र परिवार यांच्या हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाली .आदर्श शिक्षक मिराताई शिनगारे यांच्या कार्याची पोकळी कधीच भरून निघणार नसल्याचे रामायणाचार्य नाना महाराज कदम यांनी सांगितले.
पुढे कीर्तनात बोलत असताना नाना महाराज यांनी पती-पत्नीचा जीवनप्रवास हा शेवट पर्यंत टिकला पाहिजे परंतु मृत्यू ही एक अशी गोष्ट आहे की ती जन्माअगोदरच ठरलेली असते .यात कोणाचे काही चालत नाही,मग तो शेतकरी, कष्टकरी, मजूर, नोकरदार,राजा,मंत्री,,कोणालाही सोडत नाही मृत्यू अटळ आहे. त्यामुळे जीवन जगत असताना पुण्याचे काम करून आपला पुढील प्रवास सुखाचा करा.दान धर्म करा.अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ते करत चला.
ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठतील ओळी प्रमाणे “हरि मुखे म्हणा,हरि मुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी..
पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही.ही गणना कोण परमेश्वरच करू शकतो.
वैकुंठ म्हणजे काय ?वैकुंठ म्हणजे जेथे दुःख, निराशा,आळस नाही व सुखदायक दिव्य नैसर्गिक स्वर्गाचे निवास स्थान आहे.
पुण्याद्वारे मानवाला या जगात स्थान मिळते जो येथे पोहचतो तो गर्भात परत उयेणार नाही कारण त्याला तारण प्राप्त झाले आहे.अध्यत्माच्या दृष्टीने वैकुंठलोक मन वा चेतनाची स्थान आहे.मोक्ष, पुण्य करणारे लोक वैकुंठातच राहतात .जर का आपले पुण्य कमी पडले असेल तर तर आपल्या पाठीमागच्याने आपल्या नावे काही अन्नदान वैगेरे करून पुण्य मिळवून दिले तर त्यास पुढील मार्ग सुकर होतो.त्यामूळे सैदव पुण्याचे कर्म करत रहा.
जगात आपण एक प्रवासी म्हणून आलेलो असतो जसे प्रवास करत असताना आपण प्रवासाचे तिकीट काढतो पण काढलेल्या तिकिटाचे ठिकाण संपले की आपल्याला उतरावे लागते तसाच आपला जीवनप्रवास असतो.
आदर्श शिक्षिका मिरताईनी सामाजिक, शैक्षणिक कार्यातुन खरोखरच पुण्याचे काम केले आहे. आणि त्यांनतर त्यांच्यासाठी शिनगारे गोविंद नानाचे कुटुंब सदैव कर्म करत राहील असे मनोगत किर्तन सेवे प्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या मान्यवरांना संबोधित केले. *यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्व. मीराताई शिनगारे यांना विनम्र अभिवादन व अनेकांची विशेष उपस्थिती ..*. मौजे आवसगाव या स्व. मीराताई शिनगारे यांच्या मुळ गावी संपन्न झालेल्या प्रथम पुण्यस्मरणानिम्मित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित लावली होती यात ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप शिवाजी महाराज मस्के , तुकाराम पवार महिला मंडळ व शिक्षण मंडळ सावळेश्वरचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब करपे , केजचे जेष्ठ नेते सुरेश तात्या पाटील , जनविकास परिवर्तन आघाडी केजचे अध्यक्ष जेष्ठ नेते हरुणभाई इनमादार , केजच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड , जनविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रमेश भिसे , शिवसंग्रामचे रामहरी मेटे यांच्यासह नामदेव गायकवाड , डॉ उत्तम खोडसे , केज व बीड जिल्ह्यातील सर्व शिवसंग्राम परिवारातील महिला पदाधिकारी हांगे ताई , कुपकर ताई , सामाजिक कार्यकर्त्या कांबळे ताई , सांबरे ताई ई. अशोक मा विद्यालय गोटेगाव , राजर्षी शाहू मा.विद्यालय सावळेश्वर येथील सर्व सहकारी कर्मचारी वर्ग यांची तर जेष्ठ पत्रकार रामदास तपसे (मा. अध्यक्ष सक्रिय पत्रकार संघ केज), पंचक्रोशीतील भजनी मंडळ , छावाचे शिवाजी ठोंबरे , शेकापचे भाई मोहन गुंड , स्वाभिमानीचे कुलदीप करपे , वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर गिरी , प्रेरक संघटनेचे दत्तात्रय मुजमुले , प्रा.डॉ जावेद शेख , सामाजिक कार्यकर्ते डॉ हनुमंत सौदागर , अँड निखिल बुचुटे , पत्रकार राजकुमार धिवार , संभाजी ब्रिगेडचे , पुरोगामी पत्रकार संघ केज , झुंजार पत्रकार संघ केजचे सर्व सहकारी. पंचक्रोशीतील विविध गावांतील आजी माजी सरपंच उपसरपंच , चेअरमन व्हा. चेअरमन , शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षकवृंद , युवा मित्र परिवार , सामाजिक , राजकीय , शैक्षणिक, अनेक सामाजिक संघटना , आरोग्य , कृषी , औद्योगिक ,इ. सह गोविंद नाना शिनगारे परिवाराच्या सानिध्यात असलेले नातेवाईक , मित्र परिवार , मौजे आवसगाव येथील लहान थोर माता भगिनी गावकरी मंडळी यांची विशेष उपस्थिती यावेळी दिसून आली . मीराताई यांचे पती गोविंद नाना शिनगारे व परिवाराच्या वतीने संतोष शिनगारे , लक्ष्मण शिनगारे , दत्तात्रय शिनगारे , जय खाडप , परिवार आवसगाव व मीराताई यांचे बंधु महेश तपसे परिवार चंदनसावरगाव , बंधु प्रमोद चव्हाण (लोहटा) यांच्या वतीने प्रथम पुण्यस्मरणानिम्मित आलेल्या सर्व मान्यवरांचे ऋण व्यक्त करण्यात आले व
कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांची जेवण व फराळाची सुंदर अशी व्यवस्था करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.