आवसगाव ते सावळेश्वर रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी केज तहसीलसमोर आमरण उपोषण

केज दि ६(प्रतिनिधी)
तालुक्यातील आवसगाव ते सावळेश्वर आणि आवसगाव ते बनसारोळा रस्त्यावर गुडघाभर खड्डे,चिखल झाला आहे.खोल खड्यामुळे शाळकरी विद्यार्थी, नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.रस्त्याची तात्काळ दुरुस्त करा या मागणीसाठी केज तहसील कार्यालयासमोर आवसगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण गुरुवार रोजी सुरू आहे.उपोषणार्थी अविनाश साखरे, प्रदीप काळे ,ओमकार शिनगारे, परमेश्वर साखरे,आकाश आदमाणे,उत्तरेश्वर साखरे,महादेव शिनगारे, सुजय शिनगारे,नितीन साखरे,शिवाजी शिनगारे आदी गावकरी उपोषणास बसले आहेत.शेतकरी शाळकरी विद्यार्थी, व्यावसायिक,रुग्णांना रोज ये जा करावी लागते.खड्ड्याच्या रस्त्यामुळे अनेकांना प्राणांला मुकावे लागलेले आहे.वाहनचालकांना मरण यातना सोसाव्या लागत आहेत, रस्ता दुरुस्ती तात्काळ न झाल्यास गावकरी केज तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे,तात्काळ रस्ता दुरुस्ती करा अन्यथा आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.