बीड जिल्ह्याचे सामाजिक चळवळीतील युवा नेतृत्व ज्ञानेश्वर गिरी यांना महाराष्ट्र आरोग्यरत्न पुरस्कार 2022 जाहीर
किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने होणार सन्मान

वैभवशाली महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सन्मान कार्याचा समाजसेवेचा विशेष
केज प्रतिनिधी.
केज तालुक्यातील मौजे माळेगांव येथील भुमिपुत्र तथा सामाजिक , धार्मिक , शैक्षणिक , आरोग्य क्षेत्रात सदैव कार्यरत असणारे , बीड युवक जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मा.भगवंत आप्पा वायबसे यांचे निकटवर्तीय व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते तथा युवा नेतृत्व मा. ज्ञानेश्वर (माऊली) गिरी यांना या वर्षीचा मानाचा आरोग्य क्षेत्राशी निगडीत असलेला महाराष्ट्र आरोग्यरत्न पुरस्कार 2022 हा पुरस्कार किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव ता.कणकवली . जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने अध्यक्ष श्री ऋषीकेश मोरजकर यांनी जाहीर केले असुन. आजपर्यंत समाजातील कष्टकरी शेतकरी बांधवांना आरोग्य सेवा देण्यासाठी ज्यांनी अनेक आरोग्य शिबीरे आयोजित करुन जनसेवा जोपासण्यासाठी मेहनत घेतली या कार्याची विशेष दखल झाल्याने मित्र परिवार यांनी पुरस्कार जाहीर झाल्याचे समाधान व्यक्त केले असुन येणाऱ्या काही दिवसांत सदरील पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे . ज्ञानेश्वर महाराज गिरी यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच विविध क्षेत्रातील मित्र परिवारांनी हार्दिक अभिनंदन केले आहे ..