केज रोटरी डान्स स्पर्धेत आरोही काकडे, विदीशा गायकवाड प्रथम तर चेतना काळे द्वितीय स्थानी

केज प्रतिनिधी
केज: नवरात्र महोत्सवानिमित्त भवानी मंदिर परिसरात केज रोटरीने आयोजित केलेल्या डान्स स्पर्धेत कु आरोही काकडे व विदिशा गायकवाड या दोघींनी प्रथम स्थान पटकावले तर कु चेतना काळे हिने द्वितीय स्थान मिळवले. या स्पर्धेत तिसरा क्रमांक कु ज्योती नेहरकर व गार्गी गवळी यांना मिळाला. विशेष प्रोत्साहन बक्षिसे कु गार्गी भोयटे व मोरे यांनी पटकावली.
केज रोटरीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकूण 48 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धकांनी अतिशय सुंदर नृत्ये सादर केली.
या स्पर्धेचे परीक्षण रो डी एस साखरे व रो विकास मिरगणे यांनी केले. सूत्रसंचालन रो हनुमंत भोसले व दादा जमाले पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी केज शहरातील कलाप्रेमी युवक-युवती व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण श्री साई केबल टीव्ही नेटवर्क यांच्या वतीने संचालक श्री दिनकर राऊत यांनी केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण 12 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती केज रोटरीचे अध्यक्ष पशुपतीनाथ दांगट, सचिव सूर्यकांत चवरे व प्रोजेक्ट चेअरमन हनुमंत भोसले यांनी दिली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण देशपांडे, धनराज पुरी यांच्यासह इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.