कु. प्रियंका गुरव हिने बनवलेल्या रेखाचित्राने महाराष्ट्र राज्याचे महामंहीम राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी भारावले
बीड जिल्ह्यातील देवगावच्या कन्येचे राज्य पातळीवर कौतुक व अभिनंदन.

मुंबई महाराष्ट्र विशेष.
वैभवशाली महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बीड जिल्ह्यातील देवगावच्या कन्येने आपल्या बुद्धीमत्तेच्या कुशलतेने रेखाटलेल्या रेखाचित्राने महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी भारावले व विशेष बाब म्हणजे कु प्रियंका गुरव हिचे चित्रकार , तबला वादन , नृत्याची आवड म्हणून महाराष्ट्र राज्य पातळीवर विशेष कौतुक व गुणगौरव आजपर्यंत अनेक वेळा झालेला आहे , गणेश कलाक्रिडा पुणे येथे भेट घेऊन त्यानां पेन्सिल ने काढलेले स्केच भेट देण्यात आले या वेळी त्यांनी प्रियंका चे खुप खुप कौतुक केले आणि तिचा सत्कार करून तिला राजभवन येथे पाहुणचारा साठी खास आमंत्रित केले आहे
तसेच कार्यक्रमाच्या वेळी माईर्स एम आय टी समूहाचे संस्थापक डॉ विशवनाथ कराड सर यांनी खास प्रियंका गुरव ची राज्यपाल यांना ओळख करून दिली.
कु. प्रियंका गुरव ही खुप हुशार आणि आत्यंत कष्टाळू आहे तिला चित्रकलेची आवड आहे तिने कोरोनाच्या काळामध्ये घरी बसून अभ्यास करून चित्र काढण्यास सुरवात केली तिला कोणती शिकवण नसून तिने स्वतःला एक चित्रकार बनायचं आसे ठरवून तिने एका कलेला जागृत करण्याचे काम केले आहे.
तिने आता पर्यंत अनेक नामांकित,राजकीय, सामाजिक, फिल्मी, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींच्या भेटी घेऊन त्त्यांची चित्रे काढुन त्यानां भेट स्वरूपात देण्यात आली
प्रियंका गुरव ही अभ्यासाच्या बाबतीत जर तिचा विचार केला तर तीने मार्च 2022 मध्ये इत्ता दहावी मध्ये 91%गुण मिळवून तिच्या शाळेमध्ये दुसरा क्रमांक पटकवला आहे.
ती लवकरच बाहेरील राज्याच्या मुख्यमंत्री यांना भेटणार असून कला कशी जपली पाहिजे हे या वर त्यांच्या सोबत चर्चा करणार असुन अशाप्रकारे महाराष्ट्रातील खेड्यात वाढलेल्या कर्तृत्ववान मुलांनी आपल्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावल्याचे आजपर्यंत अनेक वेळा दिसून आले आहे . कु. प्रियंका गुरव हिच्या कार्याचे कौतुक सर्व स्तरातुन होत आहे.