आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिकसांस्कृतिक

आपट्याच्या पानावरील प्लास्टिक मुक्त व व्यसनमुक्त भारत या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर

विजयादशमीच्या औचित्याने सृजन संस्थेचा राज्यस्तरीय उपक्रम

वैभवशाली महाराष्ट्र न्युज

दि.१२(अहमदपूर प्रतिनिधी)
विजयादशमीच्या औचित्याने सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने सिंगल यूज प्लास्टिक मुक्त भारत (प्लास्टिक बंदी) व व्यसनमुक्त भारत जनजागृतीसाठी आपट्याच्या पानावर चित्र काढणे ही ऑनलाईन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेचे निकाल आँनलाईन यूटूबच्या माध्यमातून उपक्रमशील शिक्षिका श्रीमती पदमा कळसकर वैजापूर यांच्या हस्ते घोषित करण्यात आला.
प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका आहे.जगभरातील प्लास्टिकच्या पिशव्या समाप्त करण्यासाठी सुमारे एक हजार वर्षे लागतील.प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे दरवर्षी सुमारे एक लाख प्राणी मरत असतात.याबाबत तळागाळात जनजागृती होणे अपेक्षित आहे.तसेच भारतात तंबाखू सेवनाचे प्रमाण जास्त आहे.धुम्रपान व तंबाखूमुळे कँन्सर सारखे आजार जडतो.धुम्रपानामुळे जगातील ११% लोकांचा मृत्यू होतो.याबाबत शालेय जीवनात व समाजात जनजागृती व्हावी म्हणून सृजन संस्थेने हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहे.या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संस्थेतर्फे आवाहन केले होते.
आपट्याच्या पानावरील चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून या राष्ट्रीय जनजागृती कार्यात सहभाग घेतला. जनजागृतीपर बोलके चित्र खूपच नाविन्यपूर्ण आहेत असे मत संस्थेचे सचिव महादेव खळुरे यांनी व्यक्त केले.
सदरील स्पर्धा निःशुल्क होती.सदरील स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.मोठ्या गटातून प्रथम-ऋतुजा सुधीर कोकणे लातूर,द्वितीय-कु.नंदिनी शंकर वानखेडे वाशिम,
द्वितीय-कु.वैशाली राहुल ढवळे अहमदपूर ,तृतीय-कु.अनुष्का नारायण करपे पुणे, तृतीय-कु.मनस्वी सुरेश भोयर पुणे यांनी क्रमांक पटकावला.तर लहान गटातून प्रथम-कु.भार्गवी तानाजी वाघमोडे माळशिरस,द्वितीय-कु.कावेरी राजकुमार धडे सगरोळी,द्वितीय-कु.निराली रजनीकांत जाधव अहमदपूर , तृतीय-कृष्णा विजय चव्हाण रुई दक्षिण या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला आहे.
सदरील स्पर्धा ही आँनलाईन पद्धतीने राबविण्यात आली.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना फोन पे द्वारे रोख रक्कम व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किरण खमितकर, सलिम आतार,बस्वेश्वर थोटे,अविनाश धडे,मल्लिकार्जून खळुरे,दीपक जगताप,शिवकुमार पवार,नदीम सय्यद,बस्वेश्वर थोटे आदिचे सहकार्य लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.