महाराष्ट्रराजकीयवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

संघर्ष योद्धा – ॲड.माधव जाधव

वंचित, उपेक्षित आणि गरजवंतांच्या मदतीला धावून जाणारं खंबीर नेतृत्व

वैभवशाली महाराष्ट्र न्युज

सामाजिक , राजकीय , शैक्षणिक चळवळीला लाभलेले समृद्ध व्यक्तीमत्व अॅड माधव आप्पा जाधव

एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जन्माला आलेल्या जिद्द, चिकाटी, मुत्सद्दीपणा उराशी बाळगून आपल्या मेहनतीच्या आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर अंबाजोगाई आणि परळी परिसरात न्यायालयीन, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वबळावर आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या घाटनांदूरच्या भूमीपुत्राला अर्थात ॲड.माधव जाधव यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!

*मोडलेल्या माणसांचे, दुख ओले झेलताना…*
*अनाथांच्या उशाला, दिप लावु झोपताना…*
*कोणती ना जात ज्यांची, कोणता ना धर्म ज्यांना…*
*दु:ख ओले दोन आश्रु, माणसांचे माणसांना…*
या सुवचनाची जाणीव असलेल्या; ॲड.माधव जाधव यांनी बालवयात स्वत: प्रतिकुल व विषम परिस्थितीचा अनुभव घेतला असल्याने सामाजिक जाणिव समोर ठेवून जय भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. गतकाळात अनेक वर्षे घाटनांदूरच्या सर्व शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना दिलेली वृक्ष संवर्धन शिष्यवृत्ती, ज्यांत गणवेश, स्कुलबॅग, वह्या, कंपास, एक्झाम पॅडचा समावेश होता, स्वातंत्र्यसैनिक-गुणवंतांचे सत्कार, सांगली-कोल्हापुर पुरग्रस्तांना मदतीचा हात, शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना फराळ-ब्लँकेट वाटप, कोरोना काळात पोलिस बांधवांना जीवनाश्यक सामानाचे वाटप केले आहे. यासोबतच दुर्घटनेमुळे किंवा गरीबीमुळे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या पिडीत-गरजवंतांनासुध्दा माधव जाधव यांनी रोख स्वरुपात आर्थिक मदत करुन संबंधित कुटुंबियाच्या दु:खावर मायेची फुंकर घातली आहे. यांत विजेच्या धक्याने मृत पावलेल्या परळी येथिल संजय विडेकर यांच्या पत्नी सुनिता विडेकर यांना केलेली आर्थिक मदत, चोपनवाडीचे मयत शेतकरी महेश मोरेंचे कुटुंबिय, नागापुर येथिल गरीब विद्यार्थींनी ऋतुजा पांचाळ, धानोरा येथिल डोंगरे कुटुबिय, बर्दापुर येथिल तारामती वाले यांची गरीब मुलीच्या लग्नासाठी मदत, नागापुर येथिल राजश्री लोंढे हीचा उपचार, आईवडीलांचे छत्र हरवलेली धानोरा (बु.) येथिल अंजली व सई फोलाने, स्पायनल मस्क्युलर ऍट्रॉफीच्या उपचारासाठी घाटनांदूर येथील विष्णु पुरी यांचा मुलगा, पट्टीवडगाव येथिल वडीलांचे छत्र हरवलेली रब्बाना शेख हिच्या विवाहात भेटवस्तु, डॉक्टरचे स्वप्न पाहणारा मागासवर्गीय गरीब कुटुंबातील; पण होतकरू विद्यार्थी सुजत सत्यपाल वाघमारे, विषबाधेने मेंढ्यांचा मृत्यु झालेल्या घाटनांदूर येथिल शंकर दगडू वैद्य आदींचा समावेश आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक दत्तक घेऊन परिवाराला केलेली आर्थिक मदत, वडिलांचे छत्र हरवलेल्या शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी लावलेला हातभार, अपघातात अवेळी मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून दिलेला आधार, मागासवर्गीय व गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी केलेली आर्थिक मदत, कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने पीडित अजीज शेख सारख्या असंख्य व्यक्तींना केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे तसेच कोरोना काळात प्रत्येकाची वाताहत होत असताना अखंडित दोन महिने हजारो गरजूंना ११ हजार ३५० जेवणाचे डब्बे पुरवले तर शेकडो कुटुंबांना घरपोंच अन्नधान्य आणि किराणा माल पुरवल्यामुळे अंबाजोगाई आणि परळी तालुक्यात कष्टकरी, वंचित, उपेक्षितांच्या अडचणीत धावून जाणारं, सामाजिक क्षेत्रात सातत्यानं कार्यरत असणारं नेतृत्व म्हणून ॲड.माधव जाधव यांना ओळखलं जातं. त्यांच्याबद्दल कवी ज्ञानेश्वर डाखोरेंच्या भाषेत सांगता येईल.
*वंचितांच्या वेदनेची, तु आवाज होत गेलास..*
*मुक्यांच्या संवेदनेची, तु भाषा होत गेलास..*
*कोपलेेले होते आभाळ, अन् तापलेली होती जमिन..*
*रक्ताळलेल्या पावलांना, तु वाट देत गेलास..*
*जगणे आणि जगवीने, ही भ्रांत पाखरांची…*
*पांगुळलेल्या लेकरांना, तु साद देत गेलास…*
सांस्कृतिक अंबानगरीच्या शैक्षणिक वैभवात भर घालणारे छ.संभाजीराजे ग्लोबल स्कुलच्या माध्यमातुन योगदिन, नृत्य, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञानप्रदर्शन, वक्तृत्व व शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी ॲड.माधव जाधव यांनी केलेले विशेष प्रयत्न प्रशंसनीय आहेत. जाधव कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून असंख्य होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत देतानाच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गाध्यापन करणारे, त्यांच्यासाठी पुस्तक प्रकाशित करणारे आणि समाजमाध्यमातुन शैक्षणिक चित्रफितींची निर्मिती करणारे माधव जाधव यांना शिक्षणप्रेमी म्हणुन मराठवाडा ओळखतो. आपल्या अर्थार्जनाचा एक मोठा हिस्सा लोककल्याणासाठी खर्च करणारे ॲड.माधव जाधव अनेक अनामिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. मानवी असो वा नैसर्गिक आपत्ती, अशा संकटात “समाजऋण” फेडण्यासाठी धावुन येणारा वंचितांचा समर्थ सारथी म्हणुन माधव जाधव यांचा लौकिक आहे.

*शेतकऱ्यांचा कैवारी ॲड.माधव जाधव*

कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या परंतु शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षितांसाठी निःस्वार्थ, निरपेक्ष रोखठोक आणि निर्भीडपणे घेतलेल्या भूमिकेमुळे परळी मतदारसंघात कुठल्याही प्रस्थापित राजकाराण्यांपुढे गुडघे न टेकणारा लढवय्या नेता म्हणून ॲड.माधव जाधव यांची जनसामान्यांत ओळख आहे.
परळी मतदार संघात प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांच्या दाबावतंत्राला बळी न पडता सत्यासाठी कायम लढत राहणारे नेतृत्व म्हणून माधव जाधव हे सर्वश्रुत आहेत.
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून खोट्या केसेस विरोधात उभ्या केलेल्या आंदोलनात रान पेटवलं आणि अंबाजोगाईचे डीवायएसपी जायभायेंना अखेर सक्तीच्या रजेवर पाठवण्यासाठी प्रशासनाला भाग पडण्याचं काम केलं. निर्भीड आणि प्रस्थापित नेत्यांच्या दबावाला बळी न गेल्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले.
राजकारणात पदार्पण करण्यापूर्वी जय भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनसेवेचा वसा हाती घेतलेल्या ॲड.माधव जाधव यांनी यापूर्वी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून अत्यंत चोखरित्या काम पाहिले आहे तसेच मराठा क्रांती मोर्च्याच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत ठेवण्याचे काम जाधव यांनी केले आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शिवराय-फुले-शाहू आंबेडकरांची विचारधारा जनमानसात रुजविण्याचे बहुमूल्य कार्यही ॲड.माधव जाधव यांनी केले आहे. वेळोवेळी लोकहिताच्या प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठवला आहे. मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी निधी द्या, अंबाजोगाई येथिल स्वा.रामानंद वैद्यकीय महाविद्यालयास प्लाज्मा थेरेपी मशीन व शितपेटी दुरुस्ती, एस.टी.महामंडळाचे विलिनीकरण, शेकडो अपघात झाल्याने राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ बी चे चौपदरीकरण, शॉर्टसर्किटने सौंदना-केज येथिल तीनशे एकर ऊस जळाल्याने पिडीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत, खरीप हंगामातील पिककर्जाची मुदत वाढवणे, पिकविमा भरुन घेण्याची मागणी, लंपी आजाराचे मोफत लसीकरण, २५ टक्के अग्रीम विमा द्या, शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची दुरुस्ती, कोर्ट डीक्री व वाटणीपत्रास नोंदणी दस्ताची मागणी करु नये अशा अनेक प्रश्नावर निवेदने पाठवुन माधव जाधव यांनी यशस्वी आवाज उठवुन प्रश्न मार्गी लावले आहेत. सोबतच माधव जाधव यांनी एनआरसी-सीएए, वाघाळा टोलनाक्यावर शेतजमिनींच्या मावेजासाठी केलेले आंदोलन अत्यंत गाजले, इव्हीएम विरोधात धरणे, खतांची दरवाढ मागे घेणे, महागाई-बेरोजगारी, इंधनदरवाढ व तीन काळ्या कृषी कायदा रद्द करावा आदी जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी आंदोलने केली आहेत. सध्या ते किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या पार्लमेन्ट्री बोर्डाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या पदावर कार्यरत असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाकडे निवेदने देऊन, मोर्चे काढून, आंदोलने करून, तर कधी उपोषण करून; प्रसंगी प्रशासकिय अधिकाऱ्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम ॲड.माधव जाधव यांनी केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे निष्ठावंत पाईक म्हणुन माधव जाधव यांचे राजकीय वर्तुळातील विधायक कार्य लक्षवेधी, दिमाखदार व भरीव आहे. विद्यार्थीदशेपासुन वक्तृत्व व भाषेवर प्रभुत्व असल्याने संपुर्ण महाराष्ट्रातील सभा त्यांनी गाजवल्या आहेत तर विषयानुरुप समयोचित, मार्मिक, अभ्यासु, क्रमबध्द व शैलिदार भाषणांमुळे ॲड.माधव जाधव यांनी कित्येक सभा जिंकल्या आहेत. पक्षीय काम, शिक्षण, न्यायालय, राजकारण, समाजकारण या क्षेत्रात करतानाच जनसामान्यांच्या सर्व उत्सवात आवर्जुन सहभागी होणाऱ्याॲड. माधव जाधव यांची अचाट कार्यक्षमता पाहुण अनेकजण चकित होतात.
जनसामान्यांचे प्रश्न इथल्या व्यवस्थेला कायद्याचा आसूड हातात घेऊन सांगणारा लढवय्या आणि लोकहिताचा विचार करणारा नायक म्हणून ऍड माधव जाधव यांच्याकडे पाहिलं जात आहे. राजकीय आंदोलनातुन सर्वसामान्यांना न्याय मिळवुन देणारे सृजनशिल, संवेदनशिल व उपक्रमशिल माधव जाधव स्वाभिमानी व अभिमानी आहेत, म्हणुनच सांगायला हरकत नाही.
*हिम्मत आहे सत्याची..*
*ज्याचे संस्कार झाले घरात..*
*मोडेल पण वाकणार नाही..*
*वाढलोय अशांच्या उदरात..*
*होवु द्या वेदना कितीही..*
*जोपर्यंत जीव असेल जीवात..*
*तत्वांशी तडजोड नाही..*
*उभ्या जन्मभरात..*
*होवु द्या आघात कितीही..*
*वा निघु द्या मृत्युची वरात..*
*इश्वराशिवाय कोणालाही..*
*भिक मागणार नाही पदरात..*

शब्दांकन
दि. ना.फड सर
गणेश जाधव सर , घाटनांदुर

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.