केज येथे मराठवाडा जनता विकास परिषद बैठक कार्यक्रम
पश्चिम महाराष्ट्राने कायम दुजाभाव केला,मराठवाड्याचा रखडलेला अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत----माजी आमदार डी के देशमुख

केज दि १६(प्रतिनिधी) मराठवाडा जनता विकास परिषद या संघटनेची कार्यकारिणी मार्गदर्शन बैठक रविवार रोजी संपन्न केज येथे संपन्न झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती अँड राजेसाहेब देशमुख,संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार डी के देशमुख प्रमुख उपस्थिती, अंकुशराव इंगळे, संतराम कराड,बीड जिल्हा सचिव प्रा सुमंत गायकवाड अंबाजोगाई शाखा अध्यक्ष डॉ नरेंद्र काळे, धारूर शाखा प्रमुख प्रा विजय शिनगारे, केज शाखा अध्यक्ष जी बी गदळे,पत्रकार अनिल महाजन,आदींची उपस्थिती होती.
प्रमुख मार्गदर्शक डी के देशमुख म्हणाले पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्यावर अन्याय केलेला आहे,मराठवाड्याला विकासापासून दूर ठेवलेले आहे.
अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे, जिल्ह्यात रेल्वे आली पाहिजे.पर्यटन विकास झाला पाहिजे यासाठी विकास परिषद काम करत राहील असे मत व्यक्त केले.
गोविंदभाई श्राफ संस्थापक अध्यक्ष असलेली ही संघटना आहे.केवळ मराठवाडा विकास हाच केंद्रबिंदू ठेवून संघटनेचे कार्य सुरू आहे.
यावेळी बोलतांना राजेसाहेब देशमुख म्हणाले ग्रामीण विकासासाठी प्रमुख घटक पाणी आहे.मराठवाड्याला उजनी,कृष्णा खोरे चे २५ टीएमसी पाणी मिळाले पाहिजे.शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजेत.सर्वांचा कणा असलेला
शेतकरी वाचवला पाहिजे,
ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी लढणे ही वैचारिक चळवळीतील लोकांची जबाबदारी आहे. असे मत व्यक्त केले.
कराड म्हणाले आपण सर्वांनी मिळून विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करावा लागेल.इंगळे म्हणाले राजकारण विरहित केवळ विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम उभा करावे लागेल असे मत व्यक्त केले.महाजन यांनी ही संघटना लोकचळवळ व्हावी असे मत व्यक्त केले.काळे यांनी ग्रामीण भागासाठी आरोग्य शिक्षण दळणवळण सुकर करण्यासाठी सर्वांनी संघर्ष करून सुविधा मागणी करावी लागेल असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा डॉ काशीद यांनी केले.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विक्रम डोईफोडे यांनी तर आभार विनोद साखरे यांनी केले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.