आपला जिल्हाकृषी विशेषराजकीय

१००% पिक विमा लागु करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट पन्नास हाजाराची मदत करा भाई मोहन गुंड

केज (प्रतिनिधी )

बीड जिल्हा पावसाने झोडपला आहे हाताला आलेले पिक गेल आहे, संकट म्हणलं की शेतकऱ्याच्या पाचवीलाच जणू काय पुजलेली समस्याच आहे बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत आहेत शेतकरी आर्थिक अडचणीत आहे यामुळे शंभर टक्के पिक विमा लागू करून शेतकऱ्याना सरसगट हेक्टरी 50 हजार रुपये ची मदत करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई मोहन गुंड यांनी केली आहे,

जुलै ऑगस्ट मध्ये पावसाने ओढ दिली डोलात आलेलं सोयाबीन इतर पीक माना टाकू लागले ज्या शेतकऱ्याकडे पाणी होतं त्यांनी विज मिळाली नाही, ज्यांच्याकडे वीज आणि पाणी उपलब्ध होते त्यांनी पाणी देण्यास सुरुवात केली पन विजेचा लपंडाव सुरू झाला कुठे बिलासाठी विद्युत पुरवठा खंडत केला तर कुठे कमी दाबाने विद्युत पुरवठा सुरू असल्यामुळे विद्युत पंप चालले नाहीत यात सोयाबीनचा तर पार काटा निघाला , काही क्षेत्रात सोयाबीन बरी होती येल्लो मोजॅक गोगलगाय,चक्रीभुंगा पिवळा करपा या सारख्या रोगाने संक्रमण केले हाताला आलेले सोयाबीन गेली आणि आता आठ दिवसा पासून पाऊसच उघडायला तयार नाही, काढणीला आलेल्या सोयाबीन जागेवर खाक झाल्या तर काही ठिकाणी पाणीच पाणी झालं. ज्या शेतकऱ्यांनी काढून गंज लावल्या काढून शेतात सोयाबीन टाकली ती जागेवर भिजली यामुळे शेतकरी खूप आर्थिक संकटात सापडला आहे, म्हणुन आग्रीम विमा नको तर 100% विमा द्या,आणि नुकसान ग्रास्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हाजार रु हेक्टरी मदत द्या आन्या शेतकरी आत्महत्या होतील याला जबाबदार विमा कंपनी प्रशासन असेल यांची नोंद घ्यावी आशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे
भाई मोहन गुंड
भाई बाबाराजे गायकवाड किरण गायकवाड संजीवन देशमुख दत्ता जोगदंड यांनी तहसिलदार मार्फत कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य, आतुलजी सावे पालकमंत्री बीड यांना पाठलेल्या निवेदनात म्हटले आहे या वेळी एम एम चे केज शहराध्यक्ष तालेब इनामदार,निजाम इनामदार उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.