आपला जिल्हाकृषी विशेष

शेतकरीराजा एक वास्तव – शेतकरी पुत्र श्रीकांतराजे जाधव

रोखठोक

बहुतांश मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक पीक सोयाबीन ऊस आदी पिके आहेत. परंतु हे पिके घेत असताना शेतकऱ्यांना या काळामध्ये खूप कठीणाई होत आहे. मी सुद्धा एक शेतकरी पुत्र आहे. खूप कठीण प्रसंगातून शेतकऱ्यांचे आर्थिक पीक शेतकऱ्यांच्या हातावर पडते परंतु यावर्षी तर वेगळेच पाहायला मिळालं सोयाबीन पिकावर पहिल्यांदा पिवळा रोग पडल्यामुळे वीस ते पंचवीस टक्के प्रथम नुकसान झाले. त्यानंतर पावसाने अचानक पिक जोमात येत असताना वीस ते पंचवीस दिवस दांडी मारली तेही शेतकऱ्यांनी पचवले.. परंतु काढणीच्या टायमाला अतिवृष्टीचा फटका सर्वच शेतकऱ्याला बसला हे विसरून चालणार नाही. ही पोस्ट लिहिण्याचे कारण गेले चार दिवसापासून आमची देखील सोयाबीन काढणी चालू आहे त्यामध्ये सोयाबीन काढणी चालू असताना पावसाची ये जा यामध्ये काढलेले सोयाबीन नष्ट होत आहे निसर्ग तर किती शेतकऱ्याची परीक्षा बघतो हे तर कळायला मार्ग नाही परंतु शासनाने या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे निसर्गाला बोलता येत नाही परंतु शासनाला बोलता येतं शासन म्हणजे आपल्यातूनच निवडून गेलेले किंवा शिक्षण घेऊन उच्च पदावर गेलेले त्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे कमीत कमी हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत शेतकऱ्याला मिळणे आवश्यक आहे जेणेकरून झालेला खर्च आणि मजुरी त्या 50000 मधून मिळू शकते शेतकऱ्याचा नफा मिळणार नाही परंतु मदत म्हणजे झालेले नुकसान तर देणे शासनाला अनिवार्य आहे असे मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून प्रामाणिकपणे माडतो…

शेवट शेतकऱ्यावरच हा देश चालतो.. ही सत्यता देखील नाकारता येत नाही.. आम्हाला जर मागायची वेळ आणली तर शेतकऱ्यांच्या घरी देखील आपण मतदान मागणीसाठी आल्यानंतर शेतकऱ्यांनी देखील त्याचा विचार करावा.. आपल्या भागातून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांनी आपले कर्तव्य विसरून चालणार नाही त्यांनी मते मागताना आपल्या अडचणी दूर करू कुठलीही अडचण येऊ देणार नाही असे आश्वासन प्रत्येकाला दिलेले असते. परंतु काल राजेगाव येथे शेतकरी आत्महत्या झाली काही पुढारी भेटून देखील गेले सांत्वन केले पण कोरडे सांत्वन त्या कुटुंबाला गरजेचे नाही त्यांना आता मदतीची गरज आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबावर किती मोठी वेळ असेल हे समजून घेणे गरजेचे आहे. सांत्वन करायला जावं मी त्या विरोधाचा नाही परंतु सांत्वन करत असताना त्यामध्ये योगदान देखील असंण महत्त्वाच आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आमदार खासदार किंवा विरोधी आमदार यांनी त्या कुटुंबाकडे लक्ष देऊन त्या कुटुंबांचं त्यांच्या मुलाबाळांचं काही हित करता आलं तर करावं.. ही नम्र विनंती….
काहीजण म्हणतील हा लोकप्रतिनिधी किंवा पुढाऱ्यावरच का बोलतो ते देखील मी स्पष्टपणे सांगतो लोकप्रतिनिधी पुढारी हे वरिष्ठ पातळीला आपल्या भागातील प्रश्न लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी असतात त्यांनी त्यांचे कार्य केल्यानंतर वरिष्ठ पातळीवर दबाव वाढतो आणि आपल्याला न्याय मिळू शकतो परंतु हा दबाव केव्हा वाढेल जर आपले हे लोकप्रतिनिधी जातीने आपल्या वरिष्ठ नेत्यांना जाब विचारतील तेव्हाच….

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.