आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

तंत्रशिक्षण मंडळाच्या उन्हाळी परीक्षेत टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

=======================

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था संचलित, टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकच्या, विद्यार्थ्यांनी उन्हाळी परीक्षा – २०२४ मध्ये झालेल्या परीक्षेत पॉलिटेक्निकच्या निकालाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले. कॉम्प्यूटर इंजिनीअरींग शाखेचा निकाल शंभर टक्के इलेक्ट्रीकल इंजिनीअरींग शाखेचा निकाल ९५ टक्के, मेकॅनिकल इंजिनिअरींग शाखेचा निकाल ७५ टक्के एवढा लागला आहे. तर कॉम्प्यूटर इंजिनीअरींग शाखेतून तृतीय वर्षाचा विद्यार्थी ओम संजय बुरांडे या विद्यार्थ्यांने ९४.४७ टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

 

 

कॉम्प्यूटर इंजिनीअरींग शाखेतील तृतीय वर्षात प्रियंका मुरलीधर मुंडे (९१.१८ टक्के), मानसी ज्ञानेश्वर जगताप (८९.२० टक्के), द्वितीय वर्ष कॉम्प्यूटर शाखेतून अभिषेक सखाराम सुरवसे (९१.०७ टक्के), स्नेहल सुधाकर पवार (८८.१३ टक्के), अंजली सुधीर गवळी (८५.४७ टक्के), प्रथम वर्ष कॉम्प्यूटर इंजिनीअरींग क्षितिजा आत्माराम आगळे (९१.५३ टक्के), ज्ञानेश्वरी धनंजय सामसे (९०.२४ टक्के), अनुजा बालासाहेब खरबडे (८७.७७ टक्के), तृतीय वर्ष इलेक्ट्रीकल इंजिनीअरींग शाखेतून विश्वजीतसिंग नंदकुमार ठाकुर (९२.५० टक्के), मनीर जगदीश चौधरी (९०.७५ टक्के), अभिषेक हरिदास वांडरे (८८.५० टक्के), द्वितीय वर्ष इलेक्ट्रीकल इंजिनीअरींग शाखेतून मुक्ता परमेश्वर बीडगर (८४.६७ टक्के), साहील सिराज बागवान (८४.५३ टक्के), ओम अंकुश भगत (८३.६० टक्के), प्रथम वर्ष इलेक्ट्रीकल इंजिनीअरींग अर्पिता सतिश हर्नावळ (९०.४७ टक्के), पांडूरंग प्रेमराज पवार (८१.१८ टक्के), कृष्णा गोविंदराव यादव (७५.७७ टक्के), तृतिय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींग या शाखेतून अभिषेक श्रीकांत पुजदेकर (७५.११ टक्के), द्वितीय वर्ष मेघराज राजकुमार साठे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. तसेच गणित विषयात प्रथम वर्षातून १०० पैकी १०० गुण मिळविणारे विद्यार्थी क्षितीजा आत्माराम आगळे, समाधान अर्जुन छात्रे, ज्ञानेश्वरी धनंजय सामसे, पांडूरंग प्रेमराज पवार, अनुजा बालासाहेब खरबडे, अर्पिता सतिश हर्नावळ, तनुजा बालासाहेब खरबडे या विद्यार्थ्यांनी सर्व विषयांत जास्त गुण घेवून विशेष प्राविण्य मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, उपाध्यक्ष माधवराव पाटील चिंचोलीकर, सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनिल मिटकरी, खजीनदार विजय रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदिपकुमार दिंडीगावे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी, कार्यवाहक प्राचार्य डॉ.एन.ए.रावबावले, तंत्रनिकेतनचे प्राचार्य लक्ष्मीकांत बगले, विभागप्रमुख डॉ.व्हि.एस.राजमाने, डॉ.व्हि.व्हि.येरीगिरी, प्रा.सुशिल कुलकर्णी, प्रा.एस.ए.बिराजदार, लेखापाल आर.डी.कस्तुरे, एस.पी.मुंदडा, एम.पी.जोशी, तंत्रनिकेतनचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

 

*▪️दोन नवीन अभ्यासक्रमास मंजुरी :*

 

टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निक येथे शैक्षणिक वर्ष २०२४ पासून दोन नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रमास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, ए.आय.सी.टी.ई.नवी दिल्ली या संस्थेद्वारे मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरींग – ६०) व अनुविद्यूत संगणक अभियांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड कॉम्प्यूटर इंजिनिअरींग – ६०) या दोन नवीन अभ्यासक्रमांना मंजूरी मिळाली आहे. सध्या या महाविद्यालयात कॉम्प्यूटर इंजिनिअरींग, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग १६५ विद्यार्थी क्षमतेसह अभ्यासक्रम सुरू आहेत. त्यात या दोन अभ्यासक्रमांची भर पडल्यामुळे प्रवेश क्षमता २८५ एवढी झाली आहे. त्यामुळे परिसरातील व ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना हे नविन अभ्यासक्रम शिकून त्यांचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.