बीड जिल्हा काँग्रेस व गंगा माऊली शुगर च्या वतीने मांजरा चे जलपूजन संपन्न
आदित्य पाटील, राजेसाहेब देशमुख, सुरेश तात्या पाटील, हनुमंत मोरे यांच्या हस्ते पार पडले जलपूजन

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
औद्योगिक विश्व , सहकार , शेती , पाणी
—————————–
केज दि.१९(प्रतिनिधी)बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याची तहान भागवणारं मांजरा धरण सलग तिसऱ्याही वर्षी भरले असून सलग धरण भरण्याची हैट्रीक यावर्षी झाली आहे. हे धरण भरल्यामुळे या भागातील शेतकरी देखील मोठ्या आनंदात आहेत. या निमित्ताने दि.१९ रोजी मांजरा धरणावर बीड जिल्हा काँग्रेस कमिटी व गंगा माऊली शुगर कारखाना यांच्या वतीने जलपुजनाचा कार्यक्रम संपन्न होऊन काॅग्रेसचे युवक नेते तथा माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील, बीड जिल्हा कॉंग्रेस कमीटीचे जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, गंगा माऊली शुगर चे उपाध्यक्ष हनुमंत मोरे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, सुरेश पाटील यांच्या हस्ते जलपूजन पार पडले.
यावेळी धरणाची विधिवत पूजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आदित्य पाटील म्हणाले की, पाऊस मोठ्या प्रमानात झाल्याने धरण भरले परंतु शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सोयाबीन हातातून गेले आहे यासाठी आम्ही बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सरसगट नुकसानीची नोंद करावी म्हणून आजच निवेदन देणार असून भेटून याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले तसेच यावेळी राजेसाहेब देशमुख यांनीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व विमा मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही असून शेतकऱ्यांना न्याय मिळायलाच हवा हीच आमची प्रमुख मागणी असल्याचे म्हणाले व या गळीत हंगामापासून आपल्या हक्काचा गंगामाऊली शुगर कारखाना प्रतिदिन ६ हजार टन याप्रमाणे उस गाळप करणार असून आता कोणत्याही शेतकऱ्याने उसासाठी बेजार होण्याचे कारण नाही पाऊस भरपूर झाला आहे ऊस देखील मोठ्या प्रमाणात लावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी गंगा माऊली शुगरचे अविनाश मोरे, सुरेश पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमर पाटील, कपिल मस्के, डॉ.कविता कराड, संगिता साळवे, माजी नगराध्यक्ष कबीरोद्दिन इनामदार, दलील इनामदार, प्रताप मोरे, संभाजी देशमुख, संतोष सोनवणे, शेतकरी प्रविण खोडसे, आकाश गायकवाड, दिलीप पाटील, अरुण गुंड, समिर देशपांडे, मुन्ना ठोंबरे, दिनकर राऊत, सचिन रोडे,अक्षय गित्ते,गंगामाऊली शुगर केजचे मुख्य शेतकी अधिकारी अविनाश आदनाक इत्यादी मान्यवरांसह काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थिती होते.