कुलकर्णी कुटुंबाची एकत्रित दिवाळी वर्तमान समाजव्यवस्थेसाठी आदर्शवत – माजी आ.आर.टी.देशमुख

अंबाजोगाई (वार्ताहर)
भाजपाचे नेते तथा माजी आ.आर.टी.देशमुख यांनी दिवाळीनिमित्त कुलकर्णी बंधु कुटुंबियांची सदिच्छा भेट घेवून कौटुंबिक एकोप्याचे जाहिर कौतुक केले. एकिकडे
एकत्र कुटुंब पद्धती तथा जीवाभावाचे नाते कुठे तरी नष्ट होते की, काय ? अशी परिस्थिती असताना दुसरीकडे माञ भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या कुटुंबियात सर्व भावंडे, बहिणी दिवाळी निमित्त एकत्रित येतात. हा एकोप्याचा गोडवा अवर्णनीय असुन आपलेपणाचे नाते ज्यातून जोपासल्या जाते ते खर्या अर्थाने व्यवस्थेला आदर्श घेण्यासारखंच म्हणावं लागेल या शब्दांत भाजप नेते तथा माजी आ.आर.टी.देशमुख यांनी कौतुक केलं.
कुलकर्णी कुटुंब हे मुळचे धुनकवाड (ता.धारूर) या गावचे रहिवाशी. पण, नौकरीच्या निमित्ताने अंबाजोगाईत स्थायिक झालेले मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी आणि छोटे बंधू रोटरी क्लब बीडचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी तसेच रामभाऊंसह तीन भावंडाचे कुटुंब, दोन बहिणी एकत्रित कुटुंब पद्धतीने आज ही रहातात. कल्याण हे नौकरीच्या निमित्ताने बीडला स्थायिक असले तरी वडिलांनी जो आदर्श घालून दिला आहे तो नव्या पिढीत हस्तांतरीत होताना या भावंडांची दिवाळी माञ दरवर्षीच एकत्रित साजरी होत असते. वास्तविक पहाता पाच वर्षांपुर्वी प्रभाकरराव यांचे दु:खद निधन झाले. पण, पंच्याऐंशी वर्षांच्या मातोश्री उषाबाई कुलकर्णी यांच्या डोळ्यांसमोर तीन लेकरे आणि सविता, किशोरी दोन बहिणी आजच्या परिस्थितीत एकत्र येवून दिवाळी साजरी करतात. मग दिवाळीची खरेदी असेल किंवा इतर अदान-प्रदान उत्सव असेल. मेजर प्रा.एस.पी. हे जेष्ठ बंधू असल्याने त्यांच्या मार्गदर्शनानुसार आज ही या कुटुंबियात सर्व काही आनंदाने पार पडतं. खरे तर 85 वर्षांच्या आजींच्या डोळ्यांसमोर लेकरे, सुना, नातवंडे, पणतू यांचे एकत्रित येणे यापेक्षा दुसरा आनंद कुठलाही नव्हे. जगद्गुरू संत तुकोबाराय महाराजांनी म्हटल्याप्रमाणे “कुळी कन्या पुत्र, होते जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा हा सारा गोडवा” या कुटुंबियात पहायला मिळतो. तिनही भावंडे ही आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपली कर्तबगारी बजावताना मानवतावाद आणि परोपकाराच्या भावनेतून जगतात. विशेष म्हणजे सौ.अपर्णा, सौ.पुजा आणि सौ.उर्मिला या सुनांमधील असलेला एकोपा हा सख्ख्या बहिणींचे नाते दर्शविणारा वाटतो. नणंद, भावजयी परस्परांमधला संवाद आणि त्यातुन निर्माण होणारा गोडवा हे सारे पाहिल्यानंतर आजीचे डोळे आनंदाने समाधान दर्शवतात. दरम्यान माजी आमदार आर.टी.देशमुख (माजलगाव) यांनी नेहमीप्रमाणे यंदाही कुलकर्णी कुटुुंबियांची सदिच्छा भेट घेतली. हा एकत्रित कुटुंबाचा गोडवा पाहून ते म्हणाले की, वर्तमान व्यवस्थेला अशा आदर्शाची गरज असून कुलकर्णी परिवाराचे त्यांनी कौतुक केले.