लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉक्टरांचा सन्मान

वैभवशाली महाराष्ट्र न्युज नेटवर्क
================
अंबाजोगाई (वार्ताहर)
तालुक्यातील वरवटी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
धनत्रयोदशीचे औचित्य साधून वरवटी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून वैद्यकीय क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून “रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा” मानत कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा गोरक्षण शाळेचे संचालक ऍड.अशोक मुंडे यांनी तुलसीचे रोप व पुस्तक भेट देत सत्कार करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी गोरक्षण शाळेच्या वतीने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मुंडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.गायकवाड, डॉ.गिरी सर, डॉ.केदार सर, डॉ.निशिकांत पाचेगावकर, डॉ.शेख यांचा त्यांनी आजपर्यंत केलेल्या रूग्णसेवेसाठी सत्कार करण्यात आला. अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी येथे सुरू असलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेचे संचालक ऍड.अशोक मुंडे यांनी सांगितले की, मागील ५ वर्षांपासून लोकसहभागातून सुरू असलेल्या गोरक्षण शाळेत आज रोजी अंध, अपंग, भाकड आणि पोलिस प्रशासन तसेच सन्माननिय न्यायालयाकडून संगोपनाठी दिलेले व बेवारस आणि जखमी असे एकूण 152 गोधन असून आजपावेतो 300 पेक्षा जास्त गाईंना जीवदान देण्यात आले आहे. लोकसहभाग तसेच गोशाळेत बनवलेले पंचगव्य, गोमय उत्पादन निर्मितीतून गोशाळा स्वावलंबी बनविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत, ज्या प्रमाणे मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत, अगदी त्याचप्रमाणे ही गोशाळा चालविताना सध्या मोठ्या प्रमाणात भासणारी चारा व पाणी टंचाई तसेच निवाऱ्याची अपुरी व्यवस्था या प्रमुख समस्या, अडचणी आहेत. सध्याच्या काळात गोधनाचे रक्षण व संरक्षण करणे हे तसे कठीण काम आहे अशी माहिती गोशाळेचे संचालक ऍड.अशोक मुंडे यांनी दिली. तर आपण ही एक दानशूर व्यक्ती म्हणून आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतून गोशाळेस भेट देऊन चाऱ्यासाठी सहकार्य करावे. सध्या शेतकरी बांधवांच्या शेतातील पीक काढणीला सुरूवात होत आहे, त्यामुळे आपण जर शेतकरी असाल तर आपल्या शेतातील भुस्कट, गुळी, कडबा जर उपलब्ध असेल तर गोशाळेस देऊन सहकार्य करावे, तसेच समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि धर्मादाय संघटनांकडून लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळा वरवटी (ता.अंबाजोगाई, जि.बीड., 9764185272/, 8329552898/, 9284408407) या क्रमांकांवर संपर्क साधून गोशाळेस शक्य ती मदत व सहकार्य करावे असे आवाहन गोशाळेचे संचालक ऍड.अशोक मुंडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
================