डिजिटल मिडीयाच्या केज तालुका अध्यक्षपदी रामदास तपसे यांची निवड
सचिवपदी गौतम बचुटे , प्रकाश मुंडे उपाध्यक्ष तर अजय भांगे संघटक

निवड विशेष
केज :- मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मिडीयाच्या केज तालुका अध्यक्षपदी रामदास तपसे यांची तर सचिवपदी पत्रकार गौतम बचुटे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रकाश मुंडे यांची उपाध्यक्षपदी आणि अजय भांगे यांची संघटकपदी निवड करण्यात आली.
या बाबतची माहिती अशी की, दि. ४ नोव्हेंबर रोजी वडवणी येथे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस.एम.देशमुख सर आणि डिजिटल मिडिया प्रमुख अनिल वाघमारे, तसेच मराठी पत्रकार परिषद डिजिटल मिडिया जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसट आणि मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सदस्य विजयराज आरखडे यांच्या उपस्थितीमध्ये वडवणी येथे डिजिटल मिडीयाचे पहिले जिल्हास्तरीय अधिवेश पार पडले. या अधिवेशनात एस. एम. देशमुख आणि डिजिटल मिडिया प्रमुख अनिल वाघमारे सर, तसेच मराठी पत्रकार परिषद डिजिटल मिडिया जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसट आणि मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सदस्य विजय आरखडे यांच्या उपस्थितीमध्ये डिजिटल मीडिया केज तालुका अध्यक्षपदी रामदास तपसे यांची तर सचिवपदी गौतम बचुटे आणि उपाध्यक्षपदी प्रकाश मुंडे व संघटकपदी अजय भांगे यांची निवड करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच तालुका स्तरावरील डिजिटल मीडिया पदाधिकऱ्यांचा उर्वरित निवडी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष रामदास तपसे यांनी सांगितले आहे.