कृषी विशेषदेश विदेश

पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा आणखीन एक निर्णय ठरतोय देशातील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा

साठवणुकीचे निर्बंध हटवले अन् सोयाबीनचे भाव वाढले - भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक निर्णय घेतल्यानंतर त्यामागे शेतकर्‍यांचे कसे भले होते ? हा आर्थिक चमत्कार देशातील समस्त शेतकरी बांधवांनी चार दिवसांपूर्वीच अनुभवला आहे. केंद्र सरकारने सोयाबीन व इतर तेलबीयांच्या साठवणुकीवरील निर्बंध हाटवता क्षणीच अवघ्या काही तासातच सोयाबीनचे भाव वाढले. पाच हजारी असलेले सोयाबीन या निर्णयामुळे सहा हजार रूपयांपर्यंत पोहोचले. कदाचित सात हजार जावू शकेल. नेतृत्वात कल्याणाची दुरदृष्टी असेल तर त्याचा फायदा कसा होतो ? या कृतीतून देशवासियांनी पाहिला असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले.

आमच्या प्रतिनिधी बोलताना कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, मागच्या आठवड्यात देशातील शेतकर्‍यांनी केंद्र सरकार तथा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या एका निर्णयाचा घेतलेला अनुभव आर्थिकदृष्ट्या क्रांतीकारक कसा ठरला ? ज्यातून सिद्ध झालं. वास्तविक पहाता मागच्या आठ वर्षांपासून नरेंद्रजी मोदी यांनी शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविणारे महत्वाचे निर्णय घेतले. धानाच्या हमीभावात सतत होणारी वाढ ज्यामुळे भाव वाढीची स्पर्धा देशाच्या कृषी क्षेत्रात सुरू झाली. सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तीळ, मोहरी, गहू यांच्या हमीभावात काही वर्षांपासून सतत वाढ होते आहे. वास्तविक पहाता देशातील शेतकर्‍यांनी सोयाबीनचे भाव जास्तीत जास्त चार हजारापर्यंत पाहिले. पण, वर्तमानकाळात हेच भाव आठ हजारांपेक्षा जास्तीचे पाहिले. कापूस सुद्धा दहा हजार पेक्षा अधिक प्रति क्विंटल दराने विक्री होताना दिसतो. खरे म्हणजे शेतकर्‍यांसाठी केलेले तीन कायदे लाभदायक होते, त्यांची प्रतिष्ठा वाढवणारे पण, विरोधकांनी स्वत:च्या राजकारणापोटी शेतकर्‍यांच्या खांद्यावर बंदुका ठेवत कायद्याला मिळवलेली स्थगिती योग्य कृती नाही. काळ्या आईची सेवा करणार्‍या बळीराजाला सरकारी व्यवस्थेतून पगार मिळू शकते हे कधी स्वप्नातही कुणी पाहिले नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शेतकरी सन्मान योजनेद्वारा गरजू शेतकर्‍यांना प्रतिवर्षी सहा हजार रूपये देण्याची योजना राबवून केलेला सन्मान कमी नाही. त्याच विचारांची व्यवस्था राज्यात पुन्हा आल्यानंतर शिंदे – फडणवीसांनी देखील केंद्राच्या धर्तीवर मुख्यमंत्री सन्मान योजना सुरू करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकाचा म्हणावा लागेल. आपल्या पत्रकात पुढे कुलकर्णी म्हणतात, यंदा सोयाबीनचे भाव पाच हजारांपेक्षा जास्त जातील अशी शक्यता वाटत नव्हती. मात्र केंद्र सरकारने सोयाबीन व इतर तेलबियांच्या साठवणुकीवरचे निर्बंध एका निर्णयात हटवून टाकले आणि ज्यातून शेतकर्‍यांचे आर्थिक भविष्य घडले. या निर्णयातून बाजारात आलेल्या सोयाबीनची शेतकरी साठवणुक करू शकतो किंवा व्यापारी देखील ज्यामुळे सोयाबीनची आवक कमी होताना दिसत असून ज्याचा परिणाम भाव वाढीवर काही क्षणात सुरू झाला. अवघ्या पाच दिवसांतच पाच हजारांवर असलेले सोयाबीन सहा हजारांच्या जवळ गेले. कदाचित उद्या सात हजार रूपये प्रति क्विंटल भाव होवू शकतो. एक निर्णय शेतकर्‍यांच्या फायद्याचा कसा ठरू शकतो ? हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रत्यक्ष कृतीतून देशवासियांनी पाहिले आहे. शेतकर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोदी सरकारवर नाराज असलेले काही नेते आता या निर्णयाचे स्वागत का करीत नाहीत ? असा सवाल राम कुलकर्णी यांनी केला असून राज्यात देखील शिंदे – फडणवीस सरकारने शेतकर्‍यांचे हित लक्षात घेवून 12 तास वीज मिळवुन देण्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना निश्चित वरदान ठरणार असल्याचा दावा भाजपा प्रवक्ते कुलकर्णी यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.