दहिफळ (वड)येथील वै.बाळूताई गदळे यांच्या गंगा पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन व महाआरोग्य शिबिराचे आयोजन
दुःख बाजूला सारून गदळे कुटूंबिय करत आहे समाजकार्य

केज /प्रतिनिधी
(बातमी संकलन प्रा.डॉ .जावेद शेख)
केज तालुक्यातील दहिफळ (वड)येथील श्री वडमाऊली विद्या प्रसारक मंडळाच्या सचिव वै.बाळूताई गदळे यांचे अल्पशः आजाराने दिनांक 04/11/2022 शुक्रवार रोजी निधन झाले.त्यामुळे वै. यांचा गंगा पूजनाचा कार्यक्रम दिनांक 16/11/2022 रोजी वार बुधवार रोजी शाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दहिफळ (वड) येथे करण्यात येणार आहे .तसेच या कार्यक्रमानिमित्त ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.कै. शामराव गदळे व वै.बाळूताई यांनी आपले सर्व आयुष्य सामाजिक , शैक्षणिक कार्य करण्यात लावले त्याचाच वसा आता त्यांच्या कुटुंबाकडून होत असल्याचे दिसून येत आहे. दहिफळ वड व परिसरात शिक्षणाची गंगा कै.दादा व बाळूताई (बाई)यांच्यामुळे आली आहे. यांच्यामुळेच आज हजारो च्या संख्येने मोठ मोठ्या पदावर शाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी दिसून येत आहेत.आज एवढे मोठे दुःख असून सुद्धा सर्व दुःख बाजूला सारून कै.दादांनी आणि बाईंनी दिलेली सामाजिक शिकवण त्यांची मुले डॉ शशिकांत दहिफळकर व डॉ शालिनीताई कराड(गदळे),इंजिनियर शरद गदळे पुढे घेऊन जात असल्याचे समाजकार्यच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
महाआरोग्य शिबीर सकाळी 8 ते 11 व कीर्तन 11 ते 1या वेळेत तर भोजन 1 ते 5 या वेळेत शाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दहिफळ (वड) होणार आहे
तरी या कार्यक्रमास दहिफळ वडमाऊली व परिसरातील व संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहुन आरोग्य शिबीरामध्ये आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावे अशी विनंती डॉ शशिकांत दहिफळकर, डॉ शालिनीताई कराड(गदळे), इंजिनियर शरद(बप्पा)गदळे , ह.भ.प.,सखाहारी गदळे, भापजेचे युवा नेते राहुल भैय्या गदळे , जयदत्त गदळे, सर्व परिवाराकडून करण्यात आली आहे.