ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई येथे वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम
कल्पवृक्ष भिशी धाराशीव ग्रुप, झाडांनच्या भिशी च्या वतीने ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाईच्या प्रांगणात वृक्षारोपण

पर्यावरण विशेष
अंबाजोगाई प्रतिनिधी.
कल्पवृक्ष भिशी धाराशीव ग्रुप, झाडांनच्या भिशी च्या वतीने ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाईच्या प्रांगणात वृक्षारोपण: ” वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें” या उक्तीप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील काही बाग प्रेमी आणि वृक्ष मित्र एकत्र येऊन वृक्ष संवर्धनाचे काम करत आहेत. यातीलच एक अनोखा उपक्रम म्हणजे भिशी काढली जाते. आणि ती पूर्णपणे वृक्ष संवर्धनासाठी खर्च केली जाते. अंबाजोगाई येथील ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन संस्थेच्या प्रांगणामध्ये सदरील ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून अंबाजोगाई येथे नियोजित वृद्धाश्रम सुरू करण्यात येत आहे. यावेळी अशोक गायकवाड जिल्हा परिषद बीड चे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा वाढदिवसही वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला,ग्राम शक्ती फाउंडेशन चे अध्यक्ष ज्योतीराम सोनके, सुरेश पवार, अब्दुलवाहेद मोहम्मद सर, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदरील उपक्रमासाठी निधी देऊन मदत केल्याबद्दल कल्पवृक्ष माती विरहित बाग ग्रुप धाराशिवचे व सर्व सक्रिय सदस्य, ऍड तेजश्रीताई पाटील, संगीताताई नकाते, प्रा. वर्षा मरवळीकर -कृषी अधिकारी, डॉ स्मिता कोल्हे, प्राचार्य सुलभा देशमुख, डॉ. ज्येष्ठ कवयित्री रेखाताई ढगे तसेच इतर सर्व सदस्य यांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.