पत्रकार दिनकर जाधव यांना ऋणानुबंध फाउंडेशन चा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर
वैभवशाली महाराष्ट्र न्युज नेटवर्क विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
केज (प्रतिनिधी)
केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथील रहिवासी असलेले दिनकर किसन जाधव हे गेल्या एक तपा पेक्षा अधिक कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.
पत्रकारिता करत असतांना त्यांनी समाजातील वंचित घटकांतील अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडत हे प्रश्न प्रशासनासमोर आणि समाजासमोर मांडली. याच त्यांच्या कार्याची दखल घेत ऋणानुबंध फाउंडेशन यांनी त्यांना उत्कृष्ट पत्रकार 2022 हा पुरस्कार देऊन सन्मान करण्याचे ठरवले आहे. याच अनुषंगाने त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर पत्रकारांची नावे जाहीर केली असून यामध्ये दिनकर जाधव , श्रीकांत जाधव , संतोष रोकडे यांची नावे जाहीर केले आहेत. त्यांच्या निवडीमुळे त्यांचे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक व न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे , हारेष कांबळे , सुनिल भागवत , चंद्रसेन चोबे , प्रा.हरिदास घोळवे , प्रा.रामदास भांगे , प्रा.डॉ.कालिदास भांगे , चंद्रशेखर घोळवे , गणेश वाघमारे , सुर्यकांत देशमुख , भैया जाधव , सहा.पोलिस निरिक्षक रत्नाकर घोळवे , शंकर जाधव , केज तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष लहू केदार , श्रीधर ठोंबरे , शंकर भांगे , प्रा.विजय घोळवे , संदिप केदार ,सुदर्शन भांगे , बापुराव घोळवे ,पद्माकर घोळवे , संदिप मुळे , श्रीकांत भांगे , सुनिल घोळवे , वे.शा.सं.अनंत पांडव , पत्रकार दत्ता देशमुख , प्रा.उत्रेश्वर देशमुख , बी.के.जाधव यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळीकडून अभिनंदन होत आहे.