सोनिजवळा येथील म्हसोबा यात्रा आनंदी वातावरणात व शांततेत संपन्न!
यात्रेनिमित्त जंगी कुस्त्या रंगल्या

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
शेवटची कुस्ती 3100 रुपये
================
केज ! प्रतिनिधी
केज तालुक्यातील सोनिजवळा येथील ग्रामदैवत व महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान म्हसोबा यात्रेस रविवार ,दि 25 /22 पासून प्रारंभ झाला आहे सोनी जवळा येथील ग्रामस्थांनी म्हसोबा यात्रे निमित्त गावामध्ये विविध कार्यक्रम ठेवले होते त्यासाठी सोनी जवळा गावात यात्रा समितीच्या वतीने अगदी जय्यत तयारी केली आहे. या वर्षी गावातील तरुण युवकांनी पुढाकार घेवून यात्रेकरूंच्या स्वागताची तयारी केली आहे
गावामध्ये भाविकांच्या ” म्हसोबा महाराज की जय या ” घोषणा नी अवघा परिसर दुमदुमुन गेला आहे.
केज तालुक्यातील सोनिजवळा येथे या ग्रामदैवत म्हसोबा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांची अगदी रेलचेल आहे रविवारी दुपारी बारा गाड्या ओढणे , दररोज संध्याकाळी शोभेची दारू उडवणे, तसेच प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी शारदा गोरे यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ सुध्दा यात्रेकरूंच्या करमणूकीसाठी ठेवण्यात आले आहे सोमवारी दुपारी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, दररोज संध्याकाळी प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी शारदा गोरे वडळीकर यांचा लोकनाट्य तमाशा असून या यात्रेनिमित्त व्यापारी,दुकानदार ,आदीं साठी ग्रामपंचायत मार्फत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे दोन वर्ष कोरोनामुळे सर्व यात्रा बंद होत्या त्यामुळे या वर्षी यात्रेस यात्रेकरूंचा भरपूर प्रतिसाद पहायला मिळत आहे यावर्षी यात्रेकरू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने, कपड्यांची दुकाने, सोन्याचांदीची दुकाने , लहान मोठ्यासाठी खावूगल्ली, सर्व प्रकारच्या दुकानांनी यात्रा परिसर अगदी फुलून गेला आहे चोहिकडे आनंदाच्या वातावरणात यात्रा साजरी होताना दिसून येत आहे, कुठेही अनुचित प्रकार न होता शांततेत यात्रा पार पडत असल्यामुळे सोनिजवळा यात्रा उत्सव कमेटी चे अध्यक्ष व नवनिर्वाचित सरपंच गोविंद ससाणे व ग्राम पंचायत सोनी जवळा यांच्या वतीने यात्रा उत्सव सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले