पत्रकार अनिल वैरागे राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्काराने सन्मानित
सामाजिक , पत्रकारीता , सांस्कृतिक कार्याचा गौरव

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
केज प्रतिनिधी
दिनांक ३जानेवारी रोजी केज येथील पत्रकार अनिल लिंबाजी वैरागे यांना संगीत क्षेत्रातील राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
३जानेवारी रोजी बीड येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ व महिला विकास संघाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे अवचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये केज येथील रहिवाशी अनिल वैरागे यांना संगीत क्षेत्रातील गायन व वादन या कलेमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरोगामी पत्रकार संघ व महिला विकास संघाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी त्यांचे संगीत या क्षेत्रामधील योगदान पाहून व त्यांची कलेबद्दल असणारी निष्ठा पाहून संगीत या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच उत्कृष्ट गायन आणि वादन या कलेची दखल घेऊन व संगीत क्षेत्राशी असणार पंधरा वर्षापासूनच त्यांचं अतूट असं नातं पाहून त्यांना संगीत क्षेत्रातील लोकरत्न पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला यावेळी हा पुरस्कार माजी मंत्री प्रा. सुरेश नवले माझी उपनगराध्यक्ष बीड फारूक पटेल पुरोगामी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक भागवत जी वैद्य सर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे शारदा डुगलच सिमा ओस्तवाल गटविकास अधिकारी सचिन सानप जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के आदींच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन अनिल वैरागे यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी या कार्यक्रमास अनेक महीला व पुरुश तसेच पत्रकार उपस्थित होते यावेळी अनेक क्षेत्रातील मान्यवरांकडून व रसिक श्रोत्यांकडून तसेच पत्रकार बांधवांकडून मित्र परिवाराकडून अनिल वैरागे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.