श्री गणेश महिला बचत गटाच्या महिलांनी केली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
केज /प्रतिनिधी
केज वकीलवाडी शाहूनगर प्रशांत नगर या ठिकाणी श्री गणेश महिला बचत गटाच्या महिलांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अगदी मोठ्या उत्साहात साजरा केली यावेळी श्री गणेश महिला बचत गटाच्या अध्यक्ष सचिव तसेच या गटातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी महिलांसाठी फॅशन डिझाइनिंग प्रशिक्षण देणाऱ्या महिला शिक्षिका कुमारी दिपाली कांबळे यांनी सर्व महिलांना योग्य ते मार्गदर्शन केले त्याचबरोबर शिक्षणाचे महत्व हे देखील समजून सांगितले तसेच यावेळी या गटातील महिलांनी आपापले मनोगत व्यक्त केले तर या कार्यक्रमाची प्रस्तावना संगीता कोरडे यांनी केली व आभार श्री गणेश महिला बचत गटाच्या अध्यक्षा उषा वैरागे यांनी केले तर या कार्यक्रमास श्री गणेश महिला बचत गटाच्या सचिव लक्ष्मी सरवदे क्रांती पाटोळे सोनम वाघमारे वैशाली कांबळे प्रियांका गाढवे, वैभवी विश्वासे पूजा लोखंडे दिपाली थोरात शुभांगी कसबे स्नेहा कस्तुरे रेणुका मस्के विद्या सौदागर तसेच गटातील अनेक महिला उपस्थित होत्या.