
वैभवशाली महाराष्ट्र न्युज
केज दि ४(प्रतिनिधी)
तालुक्यातील आनंदगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अंजना गोविंद गायकवाड या होत्या .
नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील जेष्ठ महिलांचा सन्मान भाग्यश्री हनुमंत सौदागर यांच्या हस्ते करण्यात आला.
महिलांना वृक्ष, पुस्तक भेट देऊन देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना सरपंच अंजना गायकवाड म्हणाल्या सावित्रीबाई फुले यांचा वारसा घेऊन आम्ही सर्व महिला गावाच्या विकासासाठी कायम पुढाकार घेऊन काम करू महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षमपणे आम्ही काम करणार असल्याचे मत व्यक्त केले.
महिलांनी आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत मनीषा गायकवाड यांनी व्यक्त केले कार्यक्रमास महिला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.