सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या केज अध्यक्षपदी प्रा. डॉ जावेद शेख यांची निवड
संघाच्या कार्याध्यक्षपदी मनोराम पवार , सचिव शिवाजी औसेकर , तर उपाध्यक्षपदी अनिल ठोंबरे यांच्या निवडी संपन्न

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
केज /प्रतिनिधी
केज तालुक्यातील भूमीपुत्राच्या न्याय, हक्कासाठी सदैव निर्भीड पत्रकारिता करून सत्याची बाजू मांडून अनेक सामाजिक, राजकीय , आर्थिक, शैक्षणिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जनतेसमोर सत्य प्रकाशात आणून देण्यासाठी ही संघटना सदैव तत्पर राहणार आहे.सह्याद्री मराठी पत्रकार संघ केज च्या कार्यकारिणीची बैठक सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी जेष्ठ पत्रकार श्री मनोराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ,त्यामध्ये सर्वानुमते अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.जावेद शेख यांची निवड करण्यात आली.तसेच कार्याध्यक्ष मनोराम पवार , सचिव शिवाजी औसेकर , तर उपाध्यक्षपदी अनिल ठोंबरे यांच्या निवडी करण्यात आल्या.तसेच सहसचिव डॉ लतीफ शेख ,कोषाध्यक्ष गोविंद लांडगे, संघटक गोविंद शिनगारे व सदस्यपदी कातमांडे काशिनाथ,खोगरे बाळासाहेब,भाकरे दत्तात्रय , दौंड महादेव यांची निवड सर्वानुमते करण्यात आल्या असून सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .