आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणवैभवशाली महाराष्ट्र न्युजसंपादकीयसामाजिक

सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लेखणी झिजवणारा पत्रकार -प्रा. बालाजी जगतकर

अन्याय अत्याचाराच्या घटनांना आपल्या पत्रकारिता च्या माध्यमातून सर्वां समोर निर्भीडपणे मांडणारे संपादक प्रा. बालाजी जगतकर हे जिल्ह्यातील अग्रणी पत्रकार

वैभवशाली महाराष्ट्र न्युज

व्यक्ती विशेष संपादकीय लेख

परळी शहरातील सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती बीड मुख्यालयाच्या ठिकाणी आज संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य मुंबई बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष झाले,पब्लिक न्युज जिल्हा प्रतिनिधी,अनेक सामाजिक,व पत्रकारितेतील पुरस्कार प्राप्त, निर्भिड बाणा,उपेक्षित, वंचित,बहुजन समूहातील जनतेच्या न्याय हक्कासाठी लेखनी झिजवणारा, हरहुन्नरी पत्रकार, तथा संपादक, त्यांनी दैनिक मराठवाडा साथी मध्ये जवळपास आठ वर्ष काम केले आहे, बाल धमाल व विविध कार्यक्रमात त्याचा सक्रिय सहभाग असे, प्रा.बालाजी जगतकर जन्मभूमी परळी कर्मभूमी बीड निर्माण केलेले भूमिपुत्र, बुद्ध,फुले,शाहू, आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभागी असणारे,उच्च विद्या विभूषीत म्हणजेच जवाहरलाल नेहरू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात परळी येथे दहा वर्ष प्राध्यापक म्हणून व वैधनाथ कॉलेज येथे समाजशास्त्र शिकवण्याचे काम त्यांनी केले आहे ते समाजशास्त्रत M.A., आहेत,M.S.W.पदीव प्राप्त अभ्यासू, शांत, सुसंस्कृत, मृदूभाषी, मनमिळावू व्यक्तिमत्त्वाचे, अतिशय दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणून छाप पाडणारे आहे,एक समता सैनिक,बीड जिल्ह्यात समता सैनिक दल वाढवण्यात खारीचा वाटा उलनारे, पब्लिक न्युज बीड प्रतिनिधी, सा.बीड अक्षरधामचे मुख्यसंपादक तथा नवीन टायटल दैनिक बीड जनसागर चे मुख्य संपादक, नागरी संरक्षण समितीचे बीड जिल्हा कार्यध्यक्ष, बाल हक्क संरक्षण संघाचे जिल्हाकार्याध्यक्ष, संघमित्रा सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा संकल्प सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, पंचशिल सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते प्रा.बालाजी श्रावण जगतकर यांच्या वाढदिवसा निमित्त विशेष लेख वाचकांसाठी देत आहोत.
प्रा. बालाजी जगतकर हे सामाजिक, धम्मकार्यक्षेत्रा बरोबरच पत्रकारितेतील क्षेत्रात पण नावलौकिक करणारे व सामाजिक जाण जपणारे नेतृत्व आहेत. दर्पण दिनानिमित्त राजे यशवंतराव होळकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त,तसेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित,कोरोना काळा पायाला भिंगरी बांधून वाडी-वस्ती तांडा वर जाऊनअन्नधान्याच्या बातम्या करूनसर्वसामान्य ते शासना पर्यंत पाठवण्याचे काम केले आहे.
अल्पावधीतच आपल्या निर्भिड कनखर पत्रकारितेच्या व समाजसेवेच्या जोरावर लोकप्रिय झालेले, लोकांवर प्रभुत्त्व असलेले, पत्रकारितेतील चाणक्य असूनही स्वतःला समाजसेवेत झोकून देणारे सेवक असं व्यक्तिमत्व म्हणजे प्रा.बालाजी जगतकर. 12 जानेवारी 1976 या दिवशी जन्मदिवस आहे,आपण बर्‍याच सामान्य व गोर,गरीब, होतकरू लोकांचे चरित्र पत्रकारितेच्या माध्यमातून रेखाटलं आहे. पहिल्या भेटीतच त्यांची वाक्चातुर्यता,विद्वत्ता आणि त्यांच्या परखडपणाची चुणूक कुठल्या ही व्यक्तीला लागते. आपल्या समाज सेवेने आणि संवादाने आपण मोठमोठ्याना भंडावून सोडतात. अचूक ठिकाणी लक्ष्यभेद करतात, मार्मिकता, विडंबन,परखडता हजरजबाबी ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्टय. समाज माध्यमांचा उपयोग त्यांनी योग्य पद्धतीने करत अनेक एक घटना, विकृतीवर प्रकटपणे मत मांडलं आहेत, व्यक्त केला आहे व त्याचा परिणामही दिसून आलेले आहेत. प्रा.बालाजी जगतकर यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांना बर्‍याच वेळा जनतेच्या प्रश्न वर घाम फोडला आहे. तसेच त्यांनी अनेक राजकरणी, अधिकारी घडविले आहेत. शेतकर्‍यांचे प्रश्न नेहमीच आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देणारे संपादक प्रा.बालाजी जगतकर आहेत.पत्रकारितेत आपली आगळीवेगळी छाप प्रा.बालाजी जगतकर सर यांनी पाडलेली आहे. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यासह राज्यभरात मोठा मित्रपरिवार आहे. सरळ, साधा स्वभाव आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीला मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रा.बालाजी जगतकर हे सर्व परिचित आहेत. वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यानी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जबाबदारी भुमिका पार पाडली, परत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांची ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शना खाली जडण-घडण झाली आहे. या वर्षीच्या हिवाळी अधिवेशना नागपुर विधान भवनावर वंचित बहुजन आघाडीचा विविध मागासाठी महामोर्चा होता त्यातच तुम्ही सहभाग होता, सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झगडणार्‍या ते सामाजिक दायित्व आहेत. सामाजिक,धर्मकार्यात असो की सुख दुखात असो सामाजिक कार्यास हातभार लावण्यासाठी व आपले कर्तव्य बजावण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असतात.पत्रकारिता, सामाजिक,धम्मकार्य क्षेत्रात जिल्हाभरात आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सतत नाविण्यपूर्ण उपक्रम राबवताना समाजातील गरजूंसाठी मदतीचा हात देण्यासाठी प्रा.बालाजी जगतकर झोकून देवून काम करत असतात. कोणतेही काम असो असे एक ना अनेक उपक्रम राबवून आपणही समाजाचे काही देणे लागतो या भूमिकेतून सातत्याने शक्य होईल तितके आपले योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे म्हणूनच त्यांचे नाव आदराने घेतले जाते. सर्वसामान्य नागरिकांसह शेतकर्‍यांच्या शेतीपंपाला अखंडितपणे विजेचा पुरवठा व्हावा यासाठी त्यांनी पेपरच्या माध्यमातून योगदान देऊन शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच कामगारांच्या विविध मोर्चे आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्याचं काम ते अविरतपणे करत असतात. वडिलोपार्जित थोडीफार शेती असल्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध योजना व माहिती आपल्या लिखाणातून प्रकर्षाने मांडले आहे.

जिवघेण्या कोवीडच्या काळा मध्ये दोन वर्ष तीन महीने जिवाची परवा नकरता बीड जिल्ह्यातील अनेक खेड्या पाड्यात,जाऊन गरजवंतांना, गरिब,मजुरांना, किराणा किट व अन्नधान्य वाटपात सक्रिय सहभाग नोंदवला, दुर्लक्षित उपेक्षित वंचित कुटुंबांसाठी विशेष असं सहकार्य शासनाकडून मिळवून दिले.बीड शहर मुख्यालयाचे जात पडताळणी, विद्यार्थी शिष्यवृत्ती, रमाई घरकुल आवास योजनेतील त्रुटी तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील संपादकाच्या संदर्भात एक हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे बघतात.
प्रा.बालाजी जगतकर यांचा 12 जानेवारी रोजी वाढदिवस शालेय साहित्य व पुस्तके वाटप, जिव्हाळा निवारण गृह अन्नधान्य वाटप, ईनफ्रट इंडिया पाली मुलांना भेट, अनाथ आश्रमाला भेट, वृक्षारोपण, सामाजिक उपक्रमाने तसेच वृक्षारोपण राबवुन साधेपणाने साजरा होणार आहे. सामान्य माणसाच्या अडीअडचणी वृत्तपत्राच्या माध्यमातून तसेच सदैव रस्त्यावर उतरून काम करणारा आणि जिल्ह्यात, तालुक्यात सर्वाधिक जनसंपर्कात असलेला व्यक्तीमत्व म्हणून ओळख आहे. काम घेऊन आलेल्यांचे तात्काळ काम करण्याची त्यांची पद्धत आणि आपुलकीने बोलण्याच्या स्वभावावामुळे,प्रत्येक माणसाला ते आपलेसे वाटतात. त्यांच्याविषयी कोणी वाईट बोललेले लोकांनाच आवडत नाही. आपली कोणतीही अडचण प्रा.बालाजी जगतकर यांना सांगितल्यास ती अडचण सोडविण्यासाठी किंवा नक्की सुटेल असा विश्वास त्यांच्या संपर्कात आलेल्याना वाटतो.
प्रा.बालाजी जगतकर यांनी सातत्याने ग्रामिण तसेच शहरी भागातील गोरगरीब जनतेच्या हिताला प्राधान्य दिले आहे. ग्रामिण, शहरी भागातील विकासाचे विविध प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने शासनाकडे मांडले आहेत. धार्मीक, सामाजिक, राजकीय, शिक्षण, विविध सांस्कृतिक, धम्मकार्यात तसेच साहित्यीक उपक्रमात प्रा.बालाजी जगतकर यांचा सातत्याने सक्रिय सहभाग राहिला आहे. प्रा.बालाजी जगतकर यांना उदंड,निरोगी दिर्घायुष्य लाभावे व त्यांच्या हातुन पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेची यापुढे ही अखंड सेवा घडावी अशी अपेक्षा तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रार्थना व अशीच निर्भीड पत्रकारिता त्यांच्या कडून सदैव होत राहावे हीच माफक अपेक्षा..

अनिल गायकवाड
परळी.वै

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.