महात्मा ज्योतीबा फुले जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रा.मनोहर कदम सन्मानित

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रा.मनोहर कदम (रा.भावठाणा) यांना नुकतेच संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रा.मनोहर कदम हे भावठाणा येथील रहिवासी असून ते भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पळशी येथील माजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे बीड (पूर्व) जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के हे होते. तर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार, मुजीब काझी, प्रा.पटेल, संभाजी ब्रिगेडचे बीड (पूर्व) जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले व उपस्थित मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. कल्पवृक्ष गुरूकुलाच्या 100 विद्यार्थ्यांनी एकञ येवून “जिजाऊ वंदना गायिली” कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी केले. त्यांनतर प्रा. मनोहर कदम यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. जि.प.प्राथमिक शाळा कौडगावचे शाळेचे शिक्षक अमोल संगवे यांना ही आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी दोन ही आदर्श शिक्षकांना सामाजिक कार्यकर्ते मुजीब काझी यांनी “कुरआन” हा पवित्र ग्रंथ भेट म्हणून दिला. या प्रसंगी प्रा.मनोहर कदम यांनी त्यांना यापूर्वी मिळालेल्या 24 पुरस्कारांचा उल्लेख करून हा पुरस्कार देखिल समाजकार्य करून जतन केला जाईल असे सांगितले. याप्रसंगी आदर्श शिक्षक अमोल संगवे यांनी ही सत्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षीय समारोपात जिल्हाध्यक्ष प्रा.रामकिसन मस्के यांनी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जीवनावरील काही रोमहर्षक प्रसंग वर्णन करून मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड हे प्रवर्तनवादी चळवळ हाती घेवून सातत्यपूर्ण समाजसेवा करीत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार, संतराम कराड, ज्येष्ठ साहित्यिक विश्वंभर वराट गुरूजी, राजेंद्र रापतवार, विश्वनाथ गिरगिरवार, शिवाजी शिंदे, बरडे सर, सिताराम राठोड, सुरज देशमुख, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन करून उपस्थितांचे आभार गुरूकुलचा विद्यार्थी प्रतिक आवाड याने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कल्पवृक्ष गुरूकुलचे संचालक तथा सरपंच मते सर, त्यांचे कल्पवृक्ष गुरूकुलचे 100 विद्यार्थी, संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.