आपला जिल्हाराजकीयवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

बीड जिल्ह्यात रासपच्या विस्तारासाठी झगडणारा सच्चा शिलेदार संजय भोसले

अंबाजोगाई विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्युज

अंबाजोगाई विशेष

संजय भोसले हे नाव बीड जिल्ह्यातील रासप पक्षातील सध्यस्थीतीला एक आघाडीचे नाव म्हणून ओळखले जाते.तसं पाहिलं तर संजय भोसले यांची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची.घरात कुठलाही राजकिय वारसा नाही,परंतु स्वकर्तृत्वाने संजय भोसले यांनी घरची शेती करत असतानाच उद्योजकतेमध्ये चांगले बस्तान बसवले आणि अल्पावधीतच ते अंबाजोगाईच्या पंचक्रोशीमध्ये एक नवउद्योजक म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे भोसले यांनी राजकारणामध्ये उडी घेत 2012 साली त्यांनी बरदापुर गणातून प.स.निवडणूक लढवली परंतु,कुठल्याही प्रकारचा निवडणुकीचा अनुभव नसल्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.तदनंतर खऱ्या अर्थाने संजय भोसले व रासपाध्यक्ष महादेव जानकर यांचा संपर्क येत राहिला.जाणकारांच्या संपर्कात आल्याने व महादेव जानकर यांची विस्थापित समाजाबद्धल ची तळमळ आणि राजकारण करण्याची विचारधारा त्यांना आवडल्यामुळे संजय भोसले यांनी रासपमध्ये प्रवेश केला.त्यानंतर जानकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बीड जिल्ह्यात व विशेष करुन अंबाजोगाई तालुक्यात रासपच्या संघटनात्मक वाढीसाठी ते पूर्णपणे झोकून देऊन कार्यरत राहत आलेले आहेत.त्यांच्या याच पक्षीय संघटनात्मक कार्यामुळे महादेव जानकर यांनी संजय भोसले यांना 2017 सालची रासप पक्षाची जोगाईवडी जि. प.गटाची उमेदवारी दिली आणि पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे उभी केली.परंतु थोडक्या मतांनी भोसले यांचा पराभव झाला. जि. प.निवडणुकीमध्ये पराभव जरी झाला असला तरी, संजय भोसले यांनी अंबाजोगाई तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असणारा जनसंपर्क कमी होऊ दिला नाही. आजघडीला अनेक गावातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत भोसले यांनी रासप व महादेव जानकरांच्या विचारधारेच्या कार्यकर्त्यांची भक्कम मोट बांधलेली आहे.पुढे जानकरांनी देखील संजय भोसले या तळमळीच्या कार्यकर्त्याला पाठबळ देत रासप पक्षाचे मराठवाडा मुख्य महासचिव हे पद दिले.सध्यस्थीतीला बीड जिल्ह्यातील रासप पक्षातील महादेव जानकर यांच्या अत्यंत जवळचे व विश्वासु आणि उत्तम संघटन कौशल्य असणारे व्यक्तिमत्त्व म्हणुन संजय भोसले यांची ओळख झालेली आहे. आजपर्यंत रासप पक्षाचे कार्य करताना व पक्ष संगठन बांधताना संजय भोसले यांना प.स.आणि जि.प.निवडणुकांमध्ये यशाने हुलकावणी दिलेली आहे.परंतु,येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये रासप पक्षाच्या माध्यमातून तसेच आजपर्यंत बांधलेल्या पक्षसंघटनेतून आणि महादेव जानकर व निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने “विजयाचा गुलाल” संजय भोसले यांच्या कपाळी लागावा व त्यांनी राजकारणामध्ये सक्रीय सहभागी राहत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत याच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…! तूर्तास एवढेच…..!

शब्दांकन : राम निर्मळ – हिवरेकर ( अंबाजोगाई )

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.