विज्ञानातील नवीन प्रवाह मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करतील… प्रोफेसर डॉ. अशोक चव्हाण

केज दि २४(प्रतिनिधी)
केज येथील बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज यांच्या वतीने दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले . महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञानातील नवीन तंत्रज्ञान आणि त्याचा समाजाच्या एकंदरीत जीवमनाशी होणारा परिणाम या विषयावर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून प्रोफेसर अशोक चव्हाण, विभाग प्रमुख वनस्पतीशास्त्र विभाग ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद हे उपस्थित होते. उद्घाटक पर संभाषणामध्ये त्यांनी विज्ञानामध्ये येणारे संशोधनातील नवीन प्रवाह व त्याचा मानवाच्या एकंदरीत सर्वांगीण विकासासाठी होणारा उपयोग व मदत आणि नवीन संशोधकांनी करावयाचे संशोधन याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रामध्ये प्रथम सत्रामध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. मनीमाला , मणिपूर विद्यापीठ मणिपूर यांनी संशोधकांना जैवविविधतेचे संवर्धन त्याविषयीच्या वेगवेगळ्या योजना आणि त्याचा सर्वांगीण विकासासाठी होणारा उपयोग याविषयीचे सखोल मार्गदर्शन केले. या सत्राचे प्रमुख म्हणून डॉ. मिलिंद जाधव , विभाग प्रमुख वनस्पतीशास्त्र विभाग सर सय्यद कॉलेज औरंगाबाद हे उपस्थित होते. दुसऱ्या सत्रामध्ये प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. सरस, दयानंद अँग्लो वैदिक पदवीत्तर विभाग कानपूर उत्तर प्रदेश या उपस्थित होत्या डॉ सरस यांनी पर्यावरणामधील वाढते प्रदूषण व त्याचा मानवी आयुष्यभर होणारा अपायकारक परिणाम हे थांबवण्यासाठी उपयोगात आणायच्या जैव पद्धती याविषयीचे संशोधनपर मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ प्रताप नाईकवाडे वनस्पतीशास्त्र विभाग , आठल्ये सप्रे पित्रे कॉलेज देवरुख जिल्हा रत्नागिरी हे होते
या एकदिवसीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये 225 प्राध्यापक संशोधक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवून चर्चा सत्रामध्ये विविध विषयावर चर्चा करण्यास मदत केली या चर्चासत्रामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधव फावडे सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले चर्चासत्र ची सूत्रसंचालन डॉ. सुनील राऊत इंग्रजी विभाग तसेच आभार प्रदर्शन प्रोफेसर श्याम जाधव विभाग प्रमुख प्राणीशास्त्र विभाग यांनी केले या चर्चासत्राचे मुख्य संयोजक प्रोफेसर डॉ. नवनाथ काशीद यांनी चर्चा सत्रात आयोजन करण्यामागची भूमिका विषद केली आणि चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या संशोधकांचे आभार व्यक्त केले हे. चर्चासत्रामध्ये पाहुण्यांचा परिचय व तांत्रिक बाजू डॉ. संभाजी बंडे, डॉ. महादेव सुवर्णकार , डॉ. तुळशीदास बिडवे यांनी सांभाळली . चर्चासत्र यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाची शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले