शिवभक्त प्रतिष्ठानच्या कबड्डी स्पर्धेत अंबिका स्पोर्ट्स बीड अव्वल तर शिवनेरी क्रीडा मंडळ भुम पटकावला द्वितीय क्रमांक

किल्ले धारूर प्रतिनिधी
किल्ले धारूर शहरांमध्ये आमदार प्रकाश सोळंके व युवा नेते जयसिंग भैय्या सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त शिवभक्त प्रतिष्ठान व विश्वास शिनगारे यांच्या वतीने आयोजित भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते एकूण 32 संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता अतिशय उत्कृष्ट खेळ करत अंबिका स्पोर्ट बीड टीमने या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पटकावले.
शिवभक्त प्रतिष्ठानकडून प्रतिवर्षी आमदार प्रकाश सोळंके व युवा नेते जयसिंग सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाते याही वर्षी या स्पर्धेचे आयोजन दि 21 जानेवारी रोजी केले होते येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत तब्बल 32 संघाने सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक अंबीका स्पोटर्स टीमने पटकावले तर व्दितीय पारितोषिक शिवनेरी क्रिडा मंडळ भुम या टीमने पटकावले तसेच
तृतीय पारितोषिक अंबीका स्पोटर्स बीड ए या संघाने पटकावले या स्पर्धेमध्ये बेस्ट रेडर,बेस्ट डिफेंडर,मॅन अफि द सिरीज अशा विविध बक्षिसांचे वाटप विशेष खेळ दाखवणाऱ्या खेळाडूंना करण्यात आले अतिशय रोमार्षक असे सामने या स्पर्धेत प्रेक्षकांना पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये बीड जिल्हातील अंबाजोगाई,गेवराई,बीड,केज,परळी, आळसेवाडी,कौडगाव,होळ,वडवणी,तेलगांव,आडस,पाटोदा,उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब,भुम,घाडपिंप्री उस्मानाबाद,लातुर बर्दापुर,रेणापूर,जालना,सोनपेठ,परभणी तसेच मराठवाड्यातील नावाजलेले 32 संघ सहभागी झाले होते या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेर सर,नगर परिषदेचे गटनेते सुधिर शिनगारे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितिन शिनगारे,नगरसेवक संजित कोमटवार,राष्ट्रवादी युवकचे जिल्हा सरचिटणीस भागवत दराडे,युवा उघोजक सुरज कोमटवार,युवा नेते अजय गायसमुद्रे, युवा नेते गणेश सावंत,सुनिल कावळे,सय्यद रजाक भाई,पत्रकार अतुल शिनगारे,ज्ञानेश्वर शिंदे,गौतम चव्हाण,सुभाष पवार आदी मान्यवर उपस्थित होते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवभक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास शिनगारे,सचिव अंकुश कदम,उपाध्यक्ष भैय्या साखरे,कोषाध्यक्ष केदार कुरवडे,सदस्य मुंजोबा साखरे सागर इखे,बाला रुपनर,वचिष्ठ मोरे,कृष्णा थोरात,रुषिकेश गव्हाणे,विशाल भैरे,बालाजी घोडके,अशोक गव्हाणे आदींनी विशेष परिश्रम घेतले. तर पंच म्हणून पल्लेवाड सर ,गव्हाणे सर, विशाल कानमोडे,मच्छिंद्र सिरसट यांनी काम पाहिले.