आपला जिल्हामहाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

ज्येष्ठ पत्रकार राम कुलकर्णी यांना राज्यस्तरीय आदर्श बंधू भरत पुरस्कार जाहीर

कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठानची माहिती

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज मिडिया

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते तथा ज्येष्ठ पत्रकार राम प्रभाकरराव कुलकर्णी यांना कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श बंधू भरत पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.

कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवंगत विद्यार्थीप्रिय प्राचार्य कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या 8 व्या पुण्यस्मरणानिमित्त उंदरी (ता.केज जि.बीड) येथे शुक्रवार, दिनांक 19 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित विशेष समारंभात या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्र मणी तर उद्घाटक म्हणून आमदार सतीश भाऊ चव्हाण आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार सौ.नमिताताई मुंदडा तसेच प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.किशनराव गोरे, ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रमेशराव आडसकर, युवा नेते राहुलभैय्या सोनवणे, पोलिस आयुक्त अंकुशराव शिंदे, मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीपराव स्वामी, विभागीय कृषी सहसंचालक डॉ.दिनकर जाधव, प्राचार्य तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे या मान्यवरांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते तथा ज्येष्ठ पत्रकार राम प्रभाकरराव कुलकर्णी यांना कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श बंधू भरत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पहार, शाल, फेटा, श्रीफळ असे आहे. ज्येष्ठ पत्रकार राम प्रभाकरराव कुलकर्णी हे मुळ राहणार – धुनकवाड (तालुका धारूर) येथील असून सध्या ते अंबाजोगाईत राहतात. त्यांचे एकत्र कुटुंब हे आदर्श कुटुंब आहे. त्यांच्या कुटूंबात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा आणि मेजर संजय व कल्याण हे दोन भाऊ, चार पुतणे, एक पुतणी असा मोठा परिवार आहे. कुलकर्णी यांनी 1989 पासून पत्रकारितेस सुरूवात केली. त्यांनी नेहमीच पत्रकारितेला उपजीविकेचे साधन न मानता सामाजिक दायित्वातून अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लिखाण केले आहे. पत्रकारीता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी यापूर्वी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. कुलकर्णी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेपासून समाजकार्याला सुरूवात केली. तदनंतर ते भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय झाले. दिवंगत लोकनेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 30 वर्षे त्यांनी एक कार्यकर्ता व निष्ठावान सहकारी म्हणून काम केले. तसेच दिवंगत लोकनेत्या माजी आरोग्यमंत्री डॉ.विमलताई मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली ही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. दिवंगत लोकनेते बाबुरावजी आडसकर यांच्यासह विविध राजकीय पुढाऱ्यांसोबत कुलकर्णी यांचे स्नेहपूर्ण संबंध राहिलेले आहेत. सध्या ते भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा खोलेश्वर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आहेत. भारतीय जनता पार्टी मध्ये प्रदेश प्रवक्ता ही महत्त्वाची जबाबदारी मागच्या पाच वर्षांपासून ते प्रभावीपणे निभावत आहेत. एकत्र कुटुंबपद्धतीचा पुरस्कार करणारे, परखड आणि स्पष्ट बोलणे हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. बांधिलकी जोपासत सामाजिक दायित्व निभावणे, माणसे जोडण्याची उत्तम कला त्यांच्या अंगी आहे. एक कुटुंबवत्सल व्यक्ती आणि कुटुंब म्हणून कुलकर्णी परिवाराची सर्वदूर ख्याती आहे. शेती हा त्यांच्या आवडीचा विषय असून परळी, माजलगाव आणि धारूर तालुक्यात एक प्रगतशील शेतकरी म्हणून कुलकर्णी परिवाराची ख्याती आहे. सामाजिक, राजकीय, शिक्षण, अध्यात्मिक, धार्मिक कार्यात त्यांचा हिरीरीने सक्रिय सहभाग असतो. सौ.पुजाताई राम कुलकर्णी या अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवल कमेटीच्या सदस्या आहेत. अंबाजोगाई शहरात परमपूज्य हरीहर महाराज यांची श्रीमद भागवत कथा तसेच कीर्तन महोत्सव आयोजनात कुलकर्णी यांचा पुढाकार राहिला आहे. सकारात्मक पत्रकारिता करताना समाजातील वंचित, शोषीत यांना न्याय मिळवून देण्यासाठी कुलकर्णी यांची लेखणी कायमच प्रभावी ठरली आहे. नौकरदार मुलांनी त्यांच्या पगारातून दरमहा 15 टक्के रक्कम आपल्या आई – वडीलांना नियमितपणे द्यावी अशी मागणी कुलकर्णी यांनी सर्वप्रथम केली होती. सर्वपक्षीय नेत्यांसोबत कुलकर्णी यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे राजकारणात राहून ही ज्येष्ठ पत्रकार राम कुलकर्णी हे एक अजातशत्रू व परोपकारी व्यक्तीमत्व आहेत. कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श बंधू भरत पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रामभाऊ कुलकर्णी यांचे मित्र, नातेवाईक आणि समाजाच्या विविध सर्वस्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.