अंबाजोगाई क्रिडा संकुल येथे स्पर्धेचे उद्घाटन ; 5 फेब्रुवारी रोजी अंतिम सामना
अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कडून आयपीएलच्या धर्तीवर एॅम्पा क्रिकेट कप स्पर्धेचे आयोजन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (वार्ताहर)
अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्या पासून डाॅ.राहूल धाकडे यांनी नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा सपाटा लावला आहे. अंबाजोगाईसह बहूदा मराठवाड्यात प्रथमच आयपीएलच्या धर्तीवर एॅम्पा क्रिकेट कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी या स्पर्धेचे अंबाजोगाई क्रिडा संकुल येथे शानदार उद्घाटन करण्यात आले. अंबाजोगाईकर प्रथमच आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा थरार अनुभवत आहेत, या स्पर्धेचा अंतिम सामना 5 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कडून डॉक्टरांच्या एॅम्पा क्रिकेट कप स्पर्धा – 2023 चे आयोजन अंबाजोगाईत करण्यात आले असून स्पर्धेचे उद्घाटन क्रिडा अधिकारी दत्ता देवकते यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.राहूल धाकडे, डॉ.नरेंद्र काळे, डॉ.नवनाथ घुगे, डॉ.श्रीनिवास रेड्डी, डॉ.सुधीर धर्मपात्रे, डॉ.उध्दव शिंदे यांची उपस्थिती होती. एॅम्पा स्पोर्ट सेक्रेटरी डॉ.इम्रान अली यांनी मान्यवरांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एॅम्पा क्रिकेट कप स्पर्धा – 2023 च्या अनोख्या आयोजनाबद्दल संघटनेचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. स्पर्धेचे यशस्वी आयोजनाबाबत नियोजन समिती प्रमुख सचिव डॉ.विठ्ठल केंद्रे, उपाध्यक्ष डॉ.मनोज वैष्णव यांच्यासह डॉ.महेश ढेले, डॉ.ऋषिकेश घुले, डॉ.योगिनी नागरगोजे, डॉ.मनिषा पवार, डॉ.सुलभा पाटील, डॉ.शितल सोनवणे, डॉ.शिवाजी मस्के, डॉ.विशाल भुसारे यांनी सहकार्य केले. या प्रसंगी अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बहुतांश डॉक्टरांची उपस्थिती होती. मंगळवार, दिनांक 24 जानेवारी ते दिनांक 5 फेब्रुवारी या दरम्यान सामन्यांचे आयोजन केलेले आहे. हे सामने अंबाजोगाई क्रिडा संकुल येथे संपन्न होत आहेत. या स्पर्धेत पुरूष डाॅक्टर्सच्या राॅयल वाॅरीअर्स, ऑरेंज वाॅरीअर्स, ब्लू रायडर्स, राॅयल टायगर्स, पींक सुपर किंग्ज हे पाच संघ आणि महिला डाॅक्टर्सचे ग्रीन युनिवर्स प्रेसिडेंशियल टीम व पर्पल पाॅवर प्रेसिडेंशियल टीम हे दोन संघ असे मिळून एकूण सात संघ सहभागी झाले आहेत.
*डाॅक्टर्स बांधवांसाठी सातत्यपूर्ण कार्य :*
आज धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती तणावग्रस्त बनला आहे, अशा काळात नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे म्हणून 24 तास उपलब्ध राहून तत्पर वैद्यकीय सेवा देणारे डाॅक्टर्स बंधू-भगिणी यांचे ही आरोग्य सदृढ आणि त्यांना तणावमुक्त वातावरणात वैद्यकीय क्षेत्रात आणखीन रूग्णसेवा देता यावी याच विधायक दृष्टीकोनातून अंबाजोगाई शहरात पहिल्यांदाच अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढील काळात ही सर्व सन्माननिय डाॅक्टर्स बंधू-भगिणी यांना सोबत घेऊन असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
*- डॉ.राहुल धाकडे*
(अध्यक्ष, अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन.)