आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

मानवलोक संचालित मनस्वीनी महिला प्रकल्पाचा शुभारंभ

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

धारूर प्रतिनिधी .

मानवलोक संचलित मनस्वीनी महिला प्रकल्पाच्या समन्वयिका डॉक्टर प्राध्यापक अरुंधतीताई पाटील यांनी धारूर तालुक्यातील काही निवडक गावांमध्ये या प्रकल्पाची माहिती देऊन कामास सुरुवात केली आहे.
तरी या प्रकल्पामध्ये एकूण तालुक्यातील असरडोह,अंजनडोह, अरणवाडी, वागोली,खोडस आणि आवरगाव अशा सहा गावांची निवड करण्यात आली आहे. यापैकी अंजनडोह या गावाची सुद्धा निवड करण्यात आली आहे.
यावेळी मानवलोकच्या मनस्वी महिला प्रकल्पाच्या समन्विका डॉक्टर प्राध्यापक अरुंधतीताई पाटील यांनी गावातील विधवा महिला,अपंग, वयोवृद्ध आणि नूतन माध्यमिक विद्यालयातील किशोरवयीन मुला-मुलींना या प्रकल्पामध्ये कोणत्या आणि कशाप्रकारे काम करायचे आहे हे सविस्तर मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर मानव लोक संचलित महिला मनस्वीनी प्रकल्पाचे इतर मान्यवर,पदाधिकारी ही उपस्थित होते.त्यापैकी राहुल निपटे (सहाय्यक समन्वय), नंदा पाटील ( सहाय्यक समन्वयक) मनीषा फंदे, शितल जोगदंड (फील्ड सुपरवायझर) तर या प्रसंगी अंजनडोह गावच्या सरपंच सौ. उषाताई सोळंके, उपसरपंच प्रकाश (आबा) सोळंके आणि ग्रामपंचायत सदस्य दयानंद आदमने, सुधीर सोळंके, प्रमोद सोळंके आणि आणि गावातील ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.