वैभवशाली महाराष्ट्र न्यूजच्या केज तालुका प्रतिनिधीपदी महादेव दौंड यांची निवड
निवड झाल्याबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी केले अभिनंदन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
निवड झाल्याबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी केले अभिनंदन
केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे सावळेश्वर येथील श्री महादेव दौंड यांना सामाजिक शैक्षणिक कृषी आरोग्य राजकीय ऐतिहासिक लेखनाची विशेष आवाड असुन पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजाचे वैचारिक विचार व सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी पत्रकारीतेची आवड निर्माण झाली आसे मनोगत निवडीप्रसंगी दौंड यांनी व्यक्त केले . वैभवशाली महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक व कार्यकारी संपादक यांनी केज तालुक्याची जबाबदारी नियुक्तीपत्र देऊन व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देऊन करण्यात आल्याचे सांगितले .आपण समाजाचा आरसा बनवुन कामा करावे असेही नमूद करण्यात आले तसेच महादेव दौंड हे सह्याद्री मराठी पत्रकार संघ केजच्या संघाचे पदाधिकारी आहेत . निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देत निवडीचे स्वागत केले आहे .