गोविंद नाना शिनगारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भुमिपुत्रांच्यावतीने सत्कार
पाणी फाउंडेशन टिम व ग्रामपंचायत पदाधिकारी मौजे आवसगाव वाकडी येथील पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार संपन्न

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
पाणी फाउंडेशन टिम व ग्रामपंचायत पदाधिकारी मौजे आवसगाव वाकडी येथील पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार संपन्न
केज तालुका प्रतिनिधी
मौजे आवसगावचे भुमिपुत्र तथा वैभवशाली महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक गोविंद शिनगारे यांना राज्यस्तरीय जिजाऊ हिरकणी पुरस्कार 2023 हा सर्वोच्च सन्मान लातुर येथे नुकताच सहकारमहर्षी मा. श्री दिलीपरावजी देशमुख यांच्या शुभहस्ते प्राप्त झाला असुन या विशेष सन्मान सर्व गावकऱ्यांचा व माझ्या सहकाऱ्यांचा आहे असे पुरस्कार प्रदान झाल्यानंतर गोविंद शिनगारे यांनी भावना व्यक्त केल्या होत्या .या सर्व पार्श्वभूमीवर गावातील आपले सहकारी व पाणी फाउंडेशन टिम व ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच मित्र मंडळ मौजे आवसगाव वाकडी यांनी एकत्र येऊन आपल्या गावाला पत्रकारीतेतील कार्याबद्दल विशेष सन्मान झालेल्या गोविंद नाना शिनगारे यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पाणी फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष संतोष शिनगारे , उपसरपंच बाबा साखरे , जेष्ठ नेते महादेव शिनगारे , सतिश साखरे , भारत शिनगारे , ग्रा.प.सदस्य परमेश्वर साखरे , युवा नेते अंकुश साखरे , अविनाश साखरे , सुजय शिनगारे , संतोष शिनगारे , जयराम साखरे , विष्णू साखरे , अभिजित शिनगारे , संतोष शिनगारे , गणेश साखरे , युवराज शिनगारे , सह गावातील पाणी फाउंडेशन टिम व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यास गावकरी बांधवांनी आनंद व्यक्त करत सत्कार समारंभ आयोजित करुन विशेष सत्कार करण्यात आला
..
सत्कार समारंभ संपन्न झाल्यानंतर गोविंद शिनगारे यांनी सर्वांचे मानले आभार