विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी शाळा म्हणजे जिजाऊ विद्यालय होय.-मा.नगराध्यक्ष राजकिशोर मोदी
जिजाऊ विद्यालयाचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद..-विस्ताराधिकारी श्रीमती पठाण

अंबाजोगाई/प्रतिनिधी / प्रा. दत्तात्रय जाधव
अंबाजोगाई शहरातील जिजाऊ विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन कला महोत्सव- 2023 नुकतेच 30 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष श्री राजकिशोर मोदी तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती मुमताज पठाण मॅडम,बालरोग तज्ञ डॉ.श्रीनिवास रेड्डी, शांतिदुत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अंकुशराव लोंढाळ, संस्थेचे सचिव ॲड.दयानंद लोंढाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चिमुकल्यांनी मान्यवरांचे औक्षण करून कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. याप्रसंगी ॲड.दयानंद लोंढाळ यांनी शाळेचा वार्षिक अहवाल व शाळेची विविध विषयावर सुरू असलेली वाटचाल याविषयी प्रास्ताविक पर भाषण यांनी केले व वर्षभरात शाळेने राबवलेल्या विविध उपक्रमावर प्रकाश टाकला.
कलामहोत्सवाच्या निमित्ताने शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या व पालकांचे विविध स्पर्धा घेण्यात आले होते त्या स्पर्धेचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती पठाण मॅडम यांनी जिजाऊ विद्यालयाच्या कार्याचं कौतुक करत ते करत असलेले वेगवेगळे उपक्रम हे खरोखरच कौतुकास्पद आहेत त्यामुळे निश्चित या शाळेचे विद्यार्थी एक चांगल्या पदापर्यंत जातील असा विश्वास व्यक्त केला. तसेच यावेळी डॉ. रेड्डी यांनी पालक आणि विद्यार्थी यांच्यामधील कमी होत असलेला संवाद आणि मोबाईलचा झालेला वाढता वापर यासंदर्भात पालकांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष भाषणात राजकिशोर मोदी यांनी शाळेची विविध उपक्रम पाहून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिजाऊ शाळा उत्कृष्ट काम करत आहेत अशा शब्दांमध्ये शालेय प्रशासनाचे कौतुक केले.
बक्षिसवितरण समारंभानंतर गणपती बाप्पाना वंदना करून सांस्कृतिक कार्यक्रमाची मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली. पुढे छोट्या चिमुकल्यांनी बालगीत, शेतकरी गीत,गोंधळी गीत,कोळी गीत, देशभक्तीपर गीत, महापुरुषांच्या चरित्रावरील एकांकिका,भक्ती गीत विविध विषयावर अतिशय दर्जेदार संस्कृतीक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती मोहिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती रंजना माळी यांनी सूत्रसंचालन तर व श्रीमती मनीषा शिंदे यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सहशिक्षिका वृषाली गुजर, सारिका गाढवे, अनुराधा पांचाळ यांनी परिश्रम घेतले सर्व पालकांनी कार्यक्रमासाठी अनमोल असे सहकार्य केले.