आपला जिल्हावैभवशाली महाराष्ट्र न्युज

केज-२३२ विधानसभा मतदारसंघाच्या सर्व नोडल अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न

निवडणूक विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज 

 

केज /प्रतिनिधी

 

निवडणूक २०२४ अंतर्गत २३२-केज (अ.जा) विधानसभा मतदारसंघाची निवडणूक विषयक सर्व नोडल अधिकारी यांची आढावा बैठक दि. १७ आॉक्टो.२०२४ रोजी मा. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी बीड यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय घेण्यात आली. त्यामध्ये मनुष्यबळ व्यवस्थापन कक्ष, टपाली मतदान कक्ष, वाहन व्यवस्थापन कक्ष, मिडीया कक्ष, एक खिडकी कक्ष,FST/SST/VST/VVT कक्ष, मतदार यादी कार्यपद्धती कक्ष इतर अनुषंगीक कक्ष स्थापन करण्यात आलेले असून सदरील कक्षामधून निवडणूकीबाबतचे कामकाज सुरु राहणार आहे. सदरचे वरीलप्रमाणे सर्व कक्षाबाबतीत निवडणूकविषयक आढावा घेण्यात आला. तसेच केज विधानसभा मतदारसंघाअंतर्गत आंतरजिल्हा चेकपोस्ट व SST चेकपाँईट ची पाहणी मा. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी बीड व महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी निवडणूक बीड यांचे समवेत करण्यात आली. मा. जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधिकारी यांचेसमवेत कायदा व सुव्यवस्थेचे अनुषंगाने आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. दीपक वजाळे यांनी मतदारसंघातील पत्रकार यांचेशी निवडणूक कार्यक्रम, आचारसंहिता, मतदारसंख्या, मतदारांसाठी विविध सुविधा व निवडणूक तयारी बाबत माहीती दिली.

या बैठकीस श्री. महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी निवडणूक बीड, श्री. दीपक वजाळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीयअधिकारी अंबाजोगाई २३२- केज (अ.जा) विधानसभा मतदारसंघ श्री राकेश गिड्डे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार केज व श्री. विलास तरंगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार अंबाजोगाई व श्रीमती प्रियंका टोंगे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नगर परिषद अंबाजोगाई व इतर अधिकारी/कर्मचारी सदरबैठकीस उपस्थित होते. निवडणूक कामाबाबत मा. जिल्हाधिकारी बीड यांनी समाधान व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.