आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

जुन्या आठवणींना उजाळा देत जिल्हा परिषद हायस्कूल केज१९८६ च्या दहावी बॅचने लोणावळा येथे मोठ्या उत्साहात ३रे गेट-टुगेदर संपन्न

शैक्षणिक विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

 

 

बातमी संकलन महादेव दळवे,(केज)

 

एके काळी बीड जिल्ह्यात नावा-रूपास असलेली जिल्हा परिषद हायस्कूल केज येथील १९८६ दहावी च्या वर्गाच्या माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी यांनी दिनांक २७ व२८ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आनंदात गेट-टुगेदर साजरे केले, वास्तविक पाहता दहावीनंतर एकत्र येणे व आपापले सुखदुःख आपल्या बाल मित्रांना सांगणे यात खूप आनंद आहे. त्यावेळच्या दहावी वर्गातील विद्यार्थी प्रवीण देशपांडे यांच्या संकल्पनेतून एक व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला यामध्ये दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे काम केले. जस जसे व्हाट्सअप ग्रुप मध्ये संख्या वाढू लागली . तस तसे नवनवीन जुने मित्र ग्रुप मध्ये ऍड झाले नंतर सर्वानुमते कानडी माळी येथे रामकिशन राऊत यांच्या शेतात उत्साहाने पहिले गेट-टुगेदर संपन्न झाले यावेळी त्यांच्या वर्ग शिक्षकांना आमंत्रीण करण्यात आले नंतर. शिक्षकाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत पहिले गेट-टुगेदर पार पाडले. ग्रुप सभासद संख्या वाढत गेली. नंतर दुसरे गेट-टुगेदर वर्गमित्र राजू पांगळ यांच्या फार्म हाऊस वर कुर्डूवाडी येथे आनंदात पार पडले.

नंतर वेगळे काहीतरी करावे म्हणून तिसरे गेट-टुगेदर लोणावळा येथे करायचे ठरवले. लोणावळा येथे चार बंगले घेऊन या ठिकाणी विविध ठिकाणाहून आलेले वर्गमित्र एकत्र जमले यामध्ये प्राध्यापक, प्रोफेसर, सध्या मोठ मोठ्या हुद्द्यावर असणारे मित्र, व्यवसायिक, शिक्षक हे सर्व स्वतःला विसरून फक्त आपण विद्यार्थी आहोत असे या गेट-टुगेदर कडे पाहत होते कोणताही मनात भेदभाव नव्हता. संगीताच्या मैफिलीत, गाण्याच्या सुरेल आवाजात, नृत्य करत विविध पदार्थाचा आस्वाद घेत पिकनिक पॉईंट पाहिले. दुसऱ्या दिवशी लोणावळा येथील नारायणी धाम, स्वामी समर्थ मंदिर, एकवीरा देवी, आळंदी करत केज येथे समारोप केला ‌.

लोणावळा गेट-टुगेदर ला मनीषा आनंदगावकर, श्री व सौ.राजेश पांगळ, श्री व सौ‌.प्रविण देशपांडे, सरोज इंगळे श्री व सौ धनंजय धाट,श्री व सौ.राजेंद्र शिंदे ,श्री व सौ.महादेव दळवे श्री व सौ.देवा पेंढारे,

श्री व सौ गोविंद जाजू, मीना जाजू व जिजाजी, मंजुषा डोंगरे

, वंदना डोंगरे,पांडुरंग पारेकर

अरुणा बहिर,शोभा अंधारे

श्री व सौ.जगदीश लहूरीकर

श्री व सौ.जगन्नाथ मस्के

श्री व सौ.सुहास घाट

श्री व सौ.दिनकर नाईकवाडे

श्री व सौ.रामकिसन राऊत, शालन चौभारकर,दत्ता चाटे

श्री व सौ.दिलीप साखरे,

श्री व सौ.धनराज अंधारे श्री व सौ‌ राजाभाऊ काळेगोरे श्री व सौ.मेनकुदळे धनंजय, अनिल कवटेकर, श्री व सौ.मनोज दरक श्री व सौ.दिनकर चाटे इत्यादी उपस्थित होते. मैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या गेट टुगेदर कार्यक्रम यशस्वी करण्यास राजेश पांगळ यांच्या अथक परिश्रमातून व प्रवीण देशपांडे, मनीषा आनंदगावकर यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली, सर्व मित्र मैत्रिणीच्या सहकार्याने हे गेट-टुगेदर अतिशय उस्हात व खेळीमेळ्याच्या वातावरणात पार पडले.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.