क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
शिवाजी दादा ठोंबरे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे तर वृद्धाश्रमात फळे वाटप

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज :- प्रतिनिधी
मराठा आरक्षणाची खंबीर भूमिका घेत अखेरच्या श्वासापर्यंत मराठा समाजासाठी आणि आरक्षणासाठी लढत राहणारे क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांच्या वतीने विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
माझ्या समाजाला हक्काचं आरक्षण मिळावे यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून समाजासाठी आपले जीवन समर्पित करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केज तालुक्यातील मौजे उंदरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.त्याच बरोबर बोबडेवाडी येथील श्री.स्वामी समर्थ वृद्धाश्रमात फळे वाटप करत मदत रूपाने वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी छावा जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे,शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर, चव्हाण सर, प्रमोद ठोंबरे, लक्ष्मीकांत ठोंबरे,सखाराम गरडे,लक्ष्मण हंकारे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे ,अनंत शिंदे , दिनेश ठोंबरे, बाळासाहेब ठोंबरे, अनंत महाराज, अशोक ठोके, महेश पतंगे, खबर ठोंबरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.